भुसावळात तीन लाखांच्या नकली नोटांसह तिघांना अटक..
जळगाव – भुसावळ मध्ये तीन लाखांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८, रा. दुश्मनीय पार्क शिवाजीनगर जळगाव), नदीम खान रहीम खान (वय ३,० रा. सुभाष चौक शनिवार पेठ जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कादर (वय ५७, अब्दुल अमित चौक रसलपुर रोड रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काहीजण भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येत आहेत, अशी गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. नुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथक तयार करून भुसावळ शहरात सापळा रचला. व बनावट नोटांसह बुधवारी तिघांना अटक केली. संशयित एक लाखाच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याने पोलिसांनी पूर्ण तयारी केली होती. बुधवारी सायंकाळी संशयितांनी तीन ठिकाणे बदलल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण झाल्यावर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडून नोटांचे व्हेरिफिकेशन करण्यात आले.
सदरची कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ कृष्णांत पिंगळे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरी राजु सांगळे, पो हे कॉ विजय नेरकर, पो हे कॉ निलेश चौधरी, पो शि प्रशांत परदेशी, पो शी योगेश माळी, पो शी अमर अढाळे, पो शी दिलीप कोल्हे, पो शी राहुल वानखेडे, पो शी भुषण चौधरी यांनी केली .