गुन्हेगारीजळगाव जिल्हाब्रेकिंग

तलाठ्या सह कोतवाल एसीबी च्या जाळ्यात

खिरोदा – तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे व कोतवाल शांताराम यादव कोळी यांनी ४,०००/रु.लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे यांनी कोतवाल शांताराम यादव कोळी यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष स्वतः तलाठी कार्यालय खिरोदा येथे स्वीकारली. तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे व कोतवाल शांताराम यादव कोळी यांना एसीबी जळगाव येथील उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे