यावल

यावल येथे बालाजी रथोत्सव जल्लोषात साजरा 

यावल, ( प्रतिनिधी )- सु’मारे एकशे अठरा वर्षांची परंपरा असलेल्या येथील बालाजी महाराजांचा रथोत्सवाच्या मिरवणूकीस गुरूवारी सायंकाळी सहा विजेचे सुमारास येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिराचे पायथ्या लगतच्या नदी पात्रातून सुरवात झाली.सायंकाळी सात वाजेची सुमारास येथील महाराणा प्रताप नगराजवळ रथाचे आगमन झाले, याप्रसंगी खंडेरावाच्या बारागाडयाही ओढण्यात आल्या. रथोत्सवानिमित्त हरीता नदीपात्रात यात्रेचे आयोजन केलेहोते. १२गाड्या तसेच यात्रा पाहण्यासाठी शहरवासीयांची गर्दी उसळली होती बारा गाड्या तसेच यात्रा शांततेत पार पडली उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता.

त्यानंतर शहरातून रथ भ्रमणास सुरुवात झाली प्रथम भ्रमण रात्रभर सुरूच राहील पहाटेच्या सुमारास रथयात्रेची सांगता होईल रथोत्सवानिमित्ताने बाहेरगावी असलेले शहर वाशी शहरात परतले असून घरोघरी पाहुण्यांची वर्दळही आहे, रात्री उशिरापर्यंत रथोत्सव शांततेत मार्गक्रमण करीत होता

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे