यावल

सावखेडासिम ग्रा.पं.सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून ३५ लाख रुपये रक्कम वसूल का करण्यात येऊ नये..

यावल पं.स. गटविकास अधिकाऱ्यांनी मागितला लेखी खुलासा..

यावल दि.२६ ( सुरेश पाटील ) – तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायत दप्तराची चौकशी झाली असता एकूण १० प्रकरणांमध्ये,मुद्द्यांमध्ये सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक  यांनी निधी खर्च करताना अनियमितपणा करून जि.प.जळगाव,पं.स.यावल समिती आणि ग्रामपंचायतचे सर्व नियम धाब्यावर ठेवून कामकाज करून एकूण ३४ लाख ८६ हजार ८५३ रुपये रक्कम खर्च केली असल्याने ही रक्कम ५० : ५० टक्के दोघांकडून वसून का करण्यात येऊ नये अशा प्रकारे कारणे दाखवा नोटीस यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सौ.गायकवाड यांनी दिल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.२३ जुलै २०२४ रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी सौ.मंजुश्री गायकवाड यांनी सावखेडासिम ग्रामपंचायत सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेविका ( हल्ली कार्यरत ग्रा.पं.बोरखेडा खुर्द ता.यावल ) यांना दिलेली कारणे दाखवा नोटीस प्रत्यक्ष बघितली असता त्यात मुद्दा क्रमांक एक मध्ये नमूद करण्यात आले आहे की,१५ वा वित्त आयोग सन २०२३- २०२४ दप्तर पाहिले असता ४ लाख ८५ हजार इतका खर्च झाल्याचे दिसून येते, एक लाख रुपयापेक्षा जास्त खरेदी करावयाचे असल्यास ही निविदा पद्धतीने खरेदी करणे आवश्यक असताना सावखेडा सिम ग्रामपंचायत – १ निविदा पद्धतीने एलईडी बल खरेदी केले आहे आणि निविदेत आयएसआय मार्क तसेच कंपनीचे नाव नमूद नाही,कंपनीची गॅरंटी, वॉरंटी नमूद नाही.एलईडी बल खरेदी करताना अनियमितता दिसून येते म्हणून यात ४ लाख ९९ हजार ९८६ रुपये इतकी रक्कम ग्रामपंचायत सरपंच  व तत्कालीन ग्रामसेविका यांच्याकडून ५०:५० टक्के प्रमाणे का करण्यात येऊ नये असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

अशाप्रकारे सावखेडा सिम ग्रामपंचायत मध्ये मुद्दा क्रमांक एक मधील रकमेसह विविध प्रकरणांच्या १० प्रकरणात एकूण ३४ लाख ८६ हजार ८५३ रुपये रक्कम सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेविका यांच्याकडून ५०:५० टक्के प्रमाणे वसूल का करण्यात येऊ नये याबाबत मुदतीत खुलासा सादर करावा मुदतीत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास सदर बाबतीत आपले काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून एकूण दहा मुद्द्यातील नमूद केलेल्या रकमा आपणाकडून वसूल करणे बाबतची कार्यवाही कार्यालयामार्फत सुरू करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे दिलेल्या कारणे दाखवा नोटीस मध्ये यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.मंजुश्री गायकवाड यांनी म्हटले आहे.

यावल पंचायत समिती गटनेता यांच्या तक्रारीची व उपोषणाची दखल – आपल्याच गावातील सावखेडासिम ग्रामपंचायत मध्ये काही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेविका हे ग्रामपंचायतचा संपूर्ण कारभार आपल्या सोयीनुसार करीत होते आणि ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी वेळोवेळी यावल पंचायत समिती कडे लेखी तोंडी तक्रारी मासिक सभेत व इतर वेळेस केलेल्या होत्या तसेच कारवाई होत नसल्याने शेवटी ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०२३ रोजी यावल पंचायत समिती आवारात बेमुदत नऊ दिवस आमरण उपोषण ग्रामस्थांसह केले होते त्या तक्रारीची व आमरण उपोषणाची दखल घेत तब्बल एक वर्षानंतर सावखेडासीम सरपंच व तत्कालीन ग्रामसेविका यांना ३४ लाख ८६ हजार ८५३ इतक्या रकमेबाबत कारणे दाखवा नोटीस दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

तालुक्यातील एका ग्रामपंचायत मध्ये एवढा मोठा अनियमितपणा आढळून आला तर इतर ग्रामपंचायती मध्ये अनियमितपणा आहे किंवा नाही याची चौकशी कोण केव्हा करणार..? याबाबत सुद्धा तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे