भुसावळ विभागात महिला अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यक्षेत्रात महसूल पंधरवडा सुरू ..
यावल दि. २ ( सुरेश पाटील )- भुसावळ विभागात तथा यावल तालुक्यात महसूल विभागाची धुरा आयएएस उपविभागीय अधिकारी देवयानी यादव ( गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर प्रभारी विभागीय अधिकारी म्हणून सौ.अर्चना मोरे रुजू झाल्या आहेत ) तसेच तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर, आयपीएस पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग,गटविकास अधिकारी सौ.मंजुश्री गायकवाढ यांच्यासह इतर बऱ्याच विभागात तालुका व कार्यालय विभाग प्रमुख म्हणून आणि भुसावल तहसीलदार म्हणून सुद्धा महिला अधिकारी कर्मचारी आपले शासकीय कर्तव्य,दक्षतेने तसेच समय सूचकता बाळगून यशस्वी रित्या निभावत आहे त्यात आता महसूल पंधरवडा कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख विविध उपक्रम महसूल विभागात तहसीलदार सौ.नाझिरकर यांनी सुरू केले.
गुरुवार दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी यावल तहसील कार्यालयात महसूल पंधरवड्याचे उद्घाटन तहसीलदार मोहन माला नाझिरकर यांच्या व सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून महसूल पंधरवडा कसा साजरा करायचा यात नागरिकांना सहभागी करून त्यांना त्यांच्या महसूल विषयक विविध कामांची माहिती कशी करून घ्यायची याबाबत तहसीलदारांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
रेड क्रॉस सोसायटी चे पथक रक्तदान शिबिरासाठी यावल येथे आले होते रेट क्रॉस सोसायटी मार्फत तहसील कार्यालयाच्या आवारात रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये तहसीलदार यांनी स्वतः रक्तदान केले त्यांच्यासह महसूल मधील १२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले, महसूल पंधरवाडा यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार संतोष विनंती नायक तहसीलदार रशीद तडवी,मनोज खारे, यांच्यासह महसूल मधील मंडळ अधिकारी,तलाठी यांनी परिश्रम घेतले.