जळगाव

निवृत्ती नगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड नामजप सप्ताहास सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी):निवृत्ती नगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड नामजप श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सेवेस मोठ्या प्रमाणात परिसरातील सेवे करी यांनी आपला सहभाग नोंदविला आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचनास मोठ्या संख्येने सेवेकरांनी सहभाग घेतला आहे संपूर्ण सप्ताहात ७ दिवस अखंड नाम जपासह अहोरात्रंदिवस अखंड प्रहरे वीणा वादन, स्वामी माळ जप, व स्वामी चरित्र वाचनास प्रारंभ झालेला आहे

सप्ताहामध्ये सकाळी ८.३० ते १० श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण वाचन, १०.३० ला नैवेद्य आरती व नंतर स्वामी याग, गणेश याग, असे अनेक याग संपन्न होणार आहेत. तसेच दुपारी ३ वाजता देवीचे पाठ, संध्याकाळी ५ वाजता स्वामी चरित्र वाचन नंतर त्रिकाल आरती तसेच अशा अनेक सेवा स्वामी चरणी रुजू होणार आहेत

अखंड नामजप सप्ताह सोहळा साजरा करण्यासाठी निवृत्ती नगर केंद्रातील सर्व महिला,पुरुष,ज्येष्ठ नागरिक यासह सर्व सेवेकरी आपली सेवा रुजू करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे