आरोग्य व शिक्षणरावेर

रावेर श्री. व्ही. एस.नाईक महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 

नियोजन करून अभ्यास केल्यास यश नक्कीच - प्राचार्य पी.व्ही. दलाल

दसनुर प्रतिनिधी :- पुरुषोत्तम संगपाळ 

येथील श्री. व्ही. एस.नाईक महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व युनिक अकॅडमी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 रोजी विद्यार्थ्यांनी “पदवी काळात एम.पी. एस.सी. / यु.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? ” या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

व्यासपीठावर युनिक अकॅडमी जळगाव शाखा प्रमुख विकास गिरासे, सहायक नरेन्द्र पाटील, प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल, प्रा. डॉ. एस. डी. धापसे, प्रा. डॉ. सत्यशील धनले, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. एस. डी. धापसे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. विकास गिरासे, शाखा प्रमुख द युनिक अकॅडमी जळगाव, यांनी आपल्या मार्गदर्शनात राज्य व केंद्र शासना तर्फे स्पर्धा परीक्षांमार्फत भरल्या जाणाऱ्या विविध पदांची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. / यु.पी.एस.सी. परीक्षेचे बदललेले स्वरूप, गुणांची विभागणी, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वयाची अट, पूर्व आणि मुख्य परीक्षेत झालेले बदल समजावून सांगितले. विद्यार्थ्यानी एम.पी. एस.सी. / यु.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पाठ्यपुस्तक, संदर्भ ग्रंथ, वृत्तपत्र, नियतकालिक यांचे वाचन आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवण्याचा सराव ही यशाची पंचसूत्री विषद केली. प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यानि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.पी. व्ही. दलाल यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी नेहमी नियोजन करून अभ्यास करावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा असो त्याला सामोरे जाण्यासाठी आपण तयार असतो, जे विद्यार्थी अभ्यासात सातत्य व नियमितता ठेवतात त्यांना यश नक्कीच मिळते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.एस. डी. धापसे यांनी तर आभार रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष गव्हाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे