यावल(प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरपावली येथील माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांची प्रदेश काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी पदी ( निराधार निराश्रित वेक्ती विकास विभाग ) नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते , मुंबई येथील टिळक भवनात पटेल यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या प्रदेशाध्यक्षा राधिका मखमाले,प्रदेश उपाध्यक्ष शंकर ढिवरे,प्रदेश सदस्या कल्पना उनवने यांचेसह प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, आणि कार्यकर्ते उपस्थित होते .पटेल यांच्या नियुक्तीचे तालुका, पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.
Yogesh Chaudhari
सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226