यावलराजकीय

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शंभर उमेदवारी अर्ज माघार

महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल तर तर भाजप शिवसेनेचे सहकार पॅनल मध्ये समोरासमोर लढत

यावल (प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होत असलेल्या सार्वजनिक निवडणुकीची साठी उमेदवारी अर्ज माघारीचे अंतिम दिवशी गुरुवारी १०० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने रिंगणात आता ४१ उमेदवार राहिले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना (ठाकरे गट )यांचे महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल तर भाजप – शिवसेना शिंदे गट यांच्या सहकार पॅनल मधे समोरासमोर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून पाच अपक्ष उमेदवारही नसीब अजमावत आहेत. महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व आमदार शिरीष चौधरी ,माजी आमदार रमेश चौधरी, नितीन चौधरी, रा.काँ. चे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले शिवसेनेचे तालुका प्रमुख गोपाळ चौधरी हे नेतृत्व करीत आहेत तर सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी. शरद महाजन, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, गणेश नेहेते, पांडूरंग सराफ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील करत आहेत.

महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल सहकारी सोसायटी मतदार संघ- प्रभाकर नारायण सोनवणे ,केतन दिगंबर किरंगे, ज्ञानेश्वर श्रीधर ब-हाटे, भानुदास दगडू चोपडे, विनोदकुमार पंडितराव पाटील, अनिल दंगलराव साठे, प्रदीप बाळकृष्ण पाटील,योगेश सिताराम पाटील (ईमाव), नयना चंद्रशेखर चौधरी,नंदा गोपाळ महाजन (महिला राखीव), अनिल प्रल्हाद पाटील (विजा/भज)ग्रामपंचायत मतदार संघ :- सर्वसाधारण मध्येसुनील नामदेव फिरके, शेखर सोपान पाटील,सुलेमान कान्हा तडवी (अनु. ज.) पोर्णिमा राकेश भंगाळे (आर्थिक दुर्बल), व्यापारी मतदारसंघ :-अशोक त्र्यंबक चौधरी, स. युनूस स. युसुफ, हमाल मापारी मतदारसंघ :- सुनील वासुदेव बारी

भाजप शिवसेना (शिंदे गट) सहकार पॅनल

सहकारी सोसायटी मतदार संघ :-राकेश वसंत फेगडे ,हर्षल गोविंदा पाटील ,सागर राजेंद्र महाजन ,दीपक नरोत्तम चौधरी, पंकज दिनकर चौधरी उमेश प्रभाकर पाटील ,संजय चुडामन पाटील, नारायण शशिकांत चौधरी (ईमाव) , कांचन ताराचंद फालक, राखी योगराज ब-हाटे (महिला राखीव) उज्जैन सिंग भावलाल राजपूत ( विजा/ भज) ग्रामपंचायत मतदार संघ :- सर्वसाधारण विलास चंद्रभान पाटील ,सूर्यभान निंबा पाटील,  यशवंत माधव तळेले (आर्थिक दुर्बल घटक)  दगडू जनार्दन कोळी (अनु.ज.) व्यापारी मतदारसंघ:- जितेंद्र पद्माकर चौधरी, निलेश सुरेशचंद्र गडे, हमाल मापारी तोलारी मतदारसंघ :- सचिन पंढरीनाथ बारी,

तर अपक्ष उमेदवारांमध्ये ग्रामपंचायत मतदार संघात – सत्तार सुभान तडवी, योगराज यशवंत सोनवणे, ग्रामपंचायत मतदार संघात – नंदकिशोर एकनाथ सोनवणे, यशवंत तुळशीराम सपकाळे, व्यापारी मतदार संघात – नरेंद्र आबाजी पाटील असे पाच उमेदवार रिंगणात आहेत. ही माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एम.चव्हाण यांनी दिली आहे

मावळते सभापती तुषार सांडू सिंग पाटील यांची रिंगणातून माघार गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात भाजपा शिवसेनेच्या माध्यमातून अडीच वर्षे सभापतीची धुरा सांभाळणारे तुषार सांडू सिंग पाटील यांनी रिंगणातून माघार घेतल्याने राजकीय चर्चेला उत आला होता.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे