जळगाव
बालविश्व शाळेत विठ्ठल नामाची शाळा भरली
जळगाव (प्रतिनिधी)- आषाढी एकादशी निमित्त शहरातील बालविश्व सेमी इंग्लिश व इंग्लिश मिडीयम च्या वतीने उत्साहाने दिंडी चे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावणारा होता यावेळी विद्यार्थ्यानी अनेक थरारक प्रात्यक्षिक करून दाखवले.
उपस्थित पालक वर्गानी विद्यार्थ्यंच्या कलागुणांना च कौतुक केले यावेळी दिंडी चे समारोप रिंगण सोहळा रंगवून करण्यात आले यासाठी शाळेच्या संस्थापिका सौ.भारती चौधरी व संदीप चौधरी उपस्थित होते तसेच दिंडी यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.