रावेर

आषाढी एकादशी निमित्त दसनुर येथील उमेश्वर माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचा भव्य असा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला

दसनुर प्रतिनिधी :- पुरुषोत्तम संगपाळ

दसनुर येथील उमेश्वर माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी नेहरू शर्ट व पायजमा आणि डोक्यात टोपी तसेच विद्यार्थीनी साडी परिधान करून व लहान चीमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणी रुप साकारून उमेश्वर माध्यमिक विद्यालयातुन दिंडी काढण्यात आली

 

या वेळेस ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम’ या गजरात शाळेतून दिंडीला सुरुवात करुन अभंग आणि टाळ मृदुंगाच्या गजरात निघाली व सर्व शिक्षकांनी सुध्दा पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते़ चीमुकल्यांनी अभंग म्हणत मृदुंगाच्या तालावर पावली टाकत हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला.

उमेश्वर माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात असे बरेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे मुलांना शिक्षणासोबत आपल्या संस्कृतीची आवड निर्माण होत असते. व आपल्या संस्कृतीची ओळख निर्माण होऊन संस्कार पण प्राप्त करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे