गुन्हेगारीयावल

यावल वनविभागाची मोठी कारवाई बारा लाख रुपये किमतीच्या दोन ट्रक्ससह २५ हजार रुपये किमतीचे लाकूड जप्त.

यावल – वनविभागाचे उपवनसंरक्षक पथकासह गस्तीवर असताना सोमवारी किनगाव् रस्त्याने चुंचाळे गावाजवळ संशयित वाहन क्रमांक. एम. एच. २८/बी ८५४३ तर यावल ते हरिपुरा रस्त्यावर वाहन क्र.एच आर -४७ बी ०६७२ या वाहनांची तपासणी केली असता अवैध सागवानी फर्निचर व लाकूड भरलेले आढळले , दोन्ही वाहनातून सुमारे २५ हजार रुपये किमतीच्या लाकडा सह १२ लाख रुपये किमतीचे दोन ट्रक जप्त केले आहे

वनविभागाचे उपवनसंरक्षक पथकासह गस्तीवर असताना सोमवारी किनगाव् रस्त्याने चुंचाळे गावाजवळ संशयित वाहन क्रमांक. एम. एच. २८/बी ८५४३ याची तपासणी केली असता त्यात १६हजार १०० किमतीचे १३ घ. मी इमारती लाकूड व सात लाख रुपये किमतीचा ट्रक असा माल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहन चालक जियाफतआली नजाफत आली रा. सुरत गुजरात यांचेवर वन अधिनियमांतर्गत वन गुन्हा नोंदवला आहे तर यावल-हरीपुरा रस्त्यावर वाहन क्र.एच आर -४७ बी ०६७२ या वाहनांची तपासणी केली असता पंचरस जळावू लाकूड साडेचार हजार रुपये किमतीचे ४ घ. मी. व पाच लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला आहे.या प्रकरणी संशयित आरोपी वाहन चालक जब्बार् बेग सत्तरबेग रा. बऱ्हानपूर मध्यप्रदेश यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे आणून जमा केले आहे ही कारवाई , धुळे विभागाचे वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगावचे , जमीर शेख, सहाय्यक वन संरक्षक प्रथमेश हडपे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुनिल भिलावे, अजय बावणे , वनपाल अतुल तायडे व, सहकाऱ्यांनी केली आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे