यावल

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणास यावल तालुका सकल मराठा समाजाचे वतीने पाठिंबा

यावल (वार्ताहार)- मराठा आरक्षणासंदर्भात अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणास यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आंतरवाली सराटी येथे जात पाठिंबा दर्शविणारा ठराव मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला आहे. मागील 16 दिवसापासून अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहे या उपोषणाने संपूर्ण राज्य हादरले आहे यावल तालुका सकल मराठा समाजाचे वतीने माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले डी बी पाटील वसंत गजमल पाटील ललित विठ्ठल पाटील सुनील दशरथ गावडे व समाज बांधव यांनी अंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांना तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविणारा ठराव देण्यात आला आहे याप्रसंगी यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळण्यासंदर्भात वेळोवेळी केलेले आंदोलने तसेच पाच सप्टेंबर रोजी या उपोषणास पाठिंबा दर्शवणारी व मराठा, समाजास आरक्षण त्वरित द्यावे यासाठी शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनी तालुक्याचे वतीने ठराव स्वीकारत समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे