गुन्हेगारीजळगाव जिल्हा

७ हजाराची लाच घेतांना लाचखोर ग्रंथपाल एसीबी च्या जाळ्यात

चाळीसगाव – येथील करगाव आश्रम शाळेतील ग्रंथपालास ७ हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले. असुन श्रीकांत गुलाब पवार, ग्रंथपाल माध्यमिक आश्रम शाळा, करगाव. असे त्याचे नाव असुन या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यातील श्रीकांत गुलाब पवार, ग्रंथपाल माध्यमिक आश्रम शाळा करगाव यांनी या अगोदर फोन पे वर १५०००/- रुपये घेतले होते. व त्यानंतर मा.प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नती चे थकीत रक्कम ८५५१९/- रुपये मंजूर करून आणून देतो.त्यासाठी फरकाचा बिलाच्या १६ % प्रमाणे पंचासमक्ष १२०००/- रुपयांची लाचेची मागणी करून ग्रंथपाल श्रीकांत गुलाब पवार, यांनी पंचा समक्ष पहिला हप्ता म्हणून ७०००/ हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांचे वर चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई –

जळगाव ला.प्र.विभागा चे पोलिस उप अधीक्षक, सापळा पर्यवेक्षण अधिकारी, श्री.सुहास देशमुख,सापळा अधिकारी अमोल वालझाडे,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने ,एन.एन. जाधव, पोलीस निरीक्षक स.फौ. दिनेशसिंग पाटील स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. सचिन चाटे, पो. कॉ.प्रणेश ठाकुर.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे