गुन्हेगारीयावल

यावलला थट्टा-मस्करीतून उद्भवलेल्या भांडणातून  एकाचा खुन, तर दुसरा गंभीर जखमी 

यावल (प्रतिनिधी) – चहाच्या टपरीवर सुरू असलेली चेष्टा मस्करीतून परस्पर विरोधी झालेल्या भांडणातून एकावर चाकू हल्ला केल्याने उपचारादरम्यान मध्यरात्री निधन झाले तर , दुसऱ्यावर लोखंडी सळईने मारहाण झाल्याने गंभीर जखमी आहे . यात परस्पराकडून फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, शहरातील बोरावल गेट परिसरात ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळ च्या सुमारास धनगरवाडा येथील राहणारे प्रभाकर आनंदा धनगर ( वय ५५ वर्ष ) व रामा केशव ढाके (राहणार व्यास नगर यावल) यांच्यात थट्टा-मस्करी सुरू असतांना त्याचे रुपांतर भांडणात होवून रामा केशव ढाके याने हातातील चाकुने प्रभाकर धनगर यांच्यावर ह्ल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले. तातडीने धनगर यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले प्राथमिक उपचारानंतर जळगाव येथे मध्यरात्री नंतर उपचारा दरम्यान धनगर यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत प्रभाकर धनगर यांचे भाऊ अशोक आनंदा धनगर यांचे फिर्यादीवरून संशयित आरोपी रामा ढाके यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान याच प्रकरणी आशा रामा ढाके ( वय ५० वर्ष रा. देशमुख वाडा यावल ) यांनी दिलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीत म्हटले आहे की ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान फिर्यादीचे पती रामा केशव ढाके हे बोरावल गेट परीसरात सार्वजनिक ठिकाणी उभे असतांना संशयीत आरोपी प्रभाकर आनंदा धनगर यांने रामा ढाके यांना अश्लील शिविगाळ करीत लोखंडी सळईने फिर्यादीचे पती यांना डोक्यावर हातापायावर मारहाण करीत गंभीर जख्मी केले आहे. पो. नि. राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार मुजफ्फर खान या दोन्ही घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे