जळगाव

जळगाव चा राजा श्री नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे श्री राम पूजन, भारत माता पूजन, ध्वज पूजन संपन्न

जळगाव(प्रतिनिधी) – जळगाव चा राजा श्री नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे दसरा निमित्त सकाळी दहा वाजता सतरा मजली खाली भगवा चौक येथे प्रभू श्री राम पूजन, ध्वज पूजन, भारत माता पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर श्री राम पूजन, भारत माता पूजन, ध्वज पूजन करण्यात आले. पूजन झाल्यावर प्रभू श्री राम यांचा जयघोष करण्यात आला.नंतर उपस्थित असणार्‍या सर्व प्रमुख पाहुण्यांनी दसरा च्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. याचवेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथील ब्लड व्हॅन बोलवून रक्तदान शिबीर भरवण्यात आले होते.जळगाव मधील नागरिकांनी व मंडळातील कार्यकर्त्यांनी मिळून असे सोळा जणांनी रक्तदान केले यामधे हर्शभाई लोटवला यांनी स्वतः चा परिवारातील सर्व सदस्यानी रक्तदान करून सहभाग घेतला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केशव स्मृती सेवा समुह प्रमुख भरत दादा अमळकर,श्री राम अॅग्रो चे संचालक श्रीराम पाटील,नाना भाऊ सोनवणे,स्वरुप लुंकड,रोहित निकम,अमित भाटिया,सपन झुंझूनवाला,अशोक राठी, ॲड सागर चित्रे,ॲड कुलकर्णी रतलाम,दीपक जोशी,नगरसेवक बंटी जोशी,मुकुंद मेटकर,श्री नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय कुमार सुरेशचंद्र गांधी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, श्री नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळातील सदस्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळातील डॉ. अश्विनीकुमार काळुंखे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रभू श्री राम यांचा जयघोष करीत झाली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे