यावल

लोकनियुक्त सरपंच पदा करीता ५५ तर सदस्य करीता २७३ अर्ज वैध

बुधवारी माघारी नंतर लढतीचे चित्र होणार स्पष्ट

यावल : तालुक्यातील सार्वत्रिक १० तर ९ पोट निवडणूक असलेल्या १९ ग्रामपंचायतीतुन प्राप्त उमेदवारी अर्जांची सोमवारी छाणणी पार पडली यात गिरडगाव येथुन लोकनियुक्त सरपंच सह सदस्य पदा करीता अर्ज दाखल केलेल्या उमेदवारास तीसरे आपत्य असल्याच्या तक्रारी वरून अपात्र ठरवण्यात आले तर किनगाव आणी डांभुर्णी येथील तक्रारी फेटाळण्यात आल्या असुन लोकनियुक्त सरपंच पदा करीता ५५ तर सदस्य पदाकरीता २७३ उमेदवारी अर्ज वैद्य ठरवण्यात आले आहे .

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची बुधवारी अंतिम तारीख आहे उमेदवारी अर्ज माघारी नंतरच ग्रामपंचायत येथील लढतीचे चित्र स्पष्ट होईल .
यावल तालुक्यात मुदत संपलेल्या १० ग्रामपंचायतीमध्ये १० लोकनियुक्त सरपंच सह ९२ सदस्य पदाकरिता सार्वत्रिक तर विविध कारणाने रिक्त असलेल्या नऊ ग्रामपंचायतीमध्ये १ लोकनियुक्त सरपंच सह १४ सदस्यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यात मुदतीत लोक नियुक्त सरपंच पदा करीता ५६ तर सदस्य पदा करीता २७७ अर्ज प्राप्त झाले होते या प्राप्त अर्जांची छाणणी सोमवारी येथील तहसिल कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी जी.टी. सोनवणे, सचिन जगताप, ए. वाय. बडगुजर, एम. पी. देवरे, एम.एच. तडवी, मीना तडवी, बबीता चौधरी, एस. एल. पाटील, एच. एन. तडवी, व्ही.डी. पाटील, एन.पी. वैराळकर, ए. एस. खैरनार, एस. आर. शेकोकार, के. पी. वायसे यांनी केली यात गिरडगाव येथील सरपंच पदाचे व सदस्य पदाचे उमेदवार यांचे अर्ज तीन आपत्याच्या कारणाने अवैद्य ठरवण्यात आले तर साकळी गावातुन तीघांचे प्रत्येकी दोन अर्ज असल्याने त्याचा प्रत्येकी एक अर्ज अवैद्य करण्यात आला तेव्हा एकुण लोकनियुक्त सरपंच पदाचे आता ५५ अर्ज वैद्य असुन सदस्य पदाचे २७३ अर्ज वैद्य आहे. तसेच डांभुर्णी व किनगाव येथील लोकनियुक्त सरपंच सद सदस्यांच्या उमेदवारी अर्जावर तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यांच्यावर सुनावणी होत सायंकाळी ५ वाजेला या तक्रारी फेटाळण्यात आल्या आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे