उज्वला गँस योजना अंतर्गत महिलांना नवीन गँस कनेक्शन मिळवून देण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे, यांनी केली मोलाची कामगिरी…
जळगाव – उज्वला गॅस योजने अंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र काशिनाथ सपकाळे, यांनी उज्वला गॅस योजने संदर्भात काही दिवसांपूर्वी जळगाव शहरात काही महिलांची फसवणूक झाली होती. तो भोंगळ कारभार शैलेंद्र सपकाळे यांनी उघडकीस आणून जळगाव शहरात फसवणूक झालेल्या महिलांची मदत करून सदर फसवणूक करणा-या व्यक्तीं विरूद्ध शनिपेठ पो.स्टे.मध्ये गुन्ह्याची नोंद केली आहे. तरी यापुढे कोणत्याही महिलेची फसवणूक होवू नये यासाठी उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस कनेक्शन मिळणेसाठी संपर्क मे.शिरीष गॅस एजन्सी पत्ता : विसनजी नगर, जळगांव येथे संपर्क साधावा व योजने अंतर्गत गॅस कनेक्शन मिळणेसाठी सदर ठिकाणी सहकार्य करण्यात येईल. तसेच उज्वला गॅस योजनेचा लाभ शितल कोळी या महिलेला उज्वला गॅस चे नवीन कनेक्शन या एजन्सी मधे मिळालेले आहे. शितल संजय कोळी या महिलेस मे.शिरीष गॅस एजन्सी मार्फत लाभ मिळवून देण्यास शैलेंद्र सपकाळे यांनी मोलाची भूमिका बजावून सदर महिलेला गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी सदर उज्वला गॅस योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे यांनी केलेले आहे.