मंत्री अनिल पाटलांचा रोहित पवारांना सल्ला, या कारवाई चा राजकारणाशी संबंध नाही…
जळगाव प्रतिनिधी | कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी निगडित असलेल्या कार्यालयांवर केंद्रीय पथकाने छापा टाकला असून यासंदर्भात तपासणी सुरू आहे. मात्र याचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
युवा संघर्ष यात्रा होण्याच्या अगोदर सुद्धा एकदा कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाही. रोहित पवार निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याचा काही कारण नाही. त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये किती पारदर्शकता आहे हे त्यांनी जनतेसमोर आणण्याची जबाबदारी रोहित पवारांचे आहे आणि त्याची राजकीय तुलना करणे योग्य नाही. असे मत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले आहे.
समान जागा वाटपाची अपेक्षा करणे योग्य – मंत्री अनिल पाटील
आपल्याला जागा मिळाव्या ही माफक अपेक्षाही कोणत्याही पक्षाची असते तशी आमच्या पक्षाची देखील अपेक्षा आहे. ज्या इलेक्टिव्ह मेरिट च्या जागा असतील त्या संदर्भात तिन्ही पक्षांचे नेते जे ठरवतील ते फायनल असणार आहे. मात्र ज्या पक्षाला त्या ठिकाणी संख्याबळ चांगला असेल त्या ठिकाणी जागत जागेची अपेक्षा करणे योग्य असल्याचे मंत्री अनिल पाटील म्हणाले आहे