शासकीय महिला रुग्णालय बांधकाम साहित्य चोरी प्रकरणी चोरटे पोलिसांच्या ताब्यात..
जळगाव – दि.०२ मार्च रोजी रात्री मोहाडी रोड, जळगाव येथील लांडोरखोरी उद्यानाच्या पुढे शासकीय महीला रुग्णालयाचे बांधकाम सुरु असलेल्या साईट वर असलेल्या ऑफीसच्या खोलीचा कडीकोंडा तोडुन कोणीतरी अज्ञात इसमाने १,२७,०००/- रु किंमतीचे साहीत्य चोरुन नेले होते. म्हणुन सदर बाबतीत कॉन्ट्रक्टर आयुष कमलकिशोर मणियार, वय २६ वर्ष, व्यवसाय व्यापार, रा. गणेशवाडी, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची चोरी ही सरकारी मालमत्तेवरील असल्यामुळे सदर बाबतीत गुन्हा उघड करण्याबाबत वरीष्ठांच्या सुचना होत्या, त्याप्रमाणे तपास सुरु असतांना सदरची चोरी ही १) सतबिरसिंग बलवंतसिंग टाक, वय २१ वर्ष, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव, २) गुरुजितसिंग सुजाणसिंग बावरी, वय २२ वर्ष, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव, ३) तंजीम बेग नसीम बेग मिर्झा, वय ३६ वर्ष, रा. टिपु सुलतान चौक, तांबापुरा, जळगाव यांनी केली असल्याबाबतची माहीती मा. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड सो. यांना मिळाली होती.
त्याप्रमाणे आरोपी मजकुर यांना तांबापुरा येथुन ताब्यात घेतले होते. व त्यांना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त केली होती. व त्यांचे कडुन चोरी झालेल्या साहीत्यापैकी ९७०००/- रु किंमतीचे साहीत्य व गुन्हयात वापरलेली रिक्षा व मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तपासादरम्यान गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी याने नरेंद्र मानसिंग पाटील, रा. अयोध्या नगर, जळगाव यांचे कडेस मागील वर्षी घरफोडी केल्याचे कबुली दिलेली आहे. सदर बाबतीत एम.आय.डी.सी. पो.स्टे. यापुर्वी गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी सतबिरसिंग याचेवर यापुर्वी चोरी घरफोडीचे १९ गुन्हे, गुरजितसिंग याचेवर ११ गुन्हे तसेच तंजीम बेग मिझा याचेवर ०३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते सो., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, पो.उप. निरी. दिपक जगदाडे, स. फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, पो.ना. किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ. मुकेश पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, किरण पाटील, छगन तायडे, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे अशांनी केली आहे.