जळगाव

जळगाव पोलीस दलाकडून जागतीक महिला दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन..

जळगाव – ८ मार्च रोजी जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडुन महिला दिन सप्ताह साजरा केला जात आहे.दि. ०७ रोजी गुरुवारी सकाळी ६ वा. पोलीस कवायत मैदानापासुन महिलांसांठी ३ किमी व ५ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी, कर्मचारी, पोलीस कुटुंबिय व जळगाव शहरातील महिला यांनी सहभाग घेतला. स्पर्धेला  पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेची सुरुवात केली.

स्पर्धा एकुण ४ वयोगटामध्ये घेण्यात येवुन त्यात प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या महिलांचा मेडल व प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला. सदर स्पर्धेला अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिह, मनपा आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड, माजी महापौर जयश्री महाजन, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत, पोलीस उप अधीक्षक (गृह) प्रमोद पवार, यांच्यासह इतर महिला अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. सदरची मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीतेसाठी पोउपनिरी. श्रीमती रेश्मा अवतारे व पोलीस वेल्फेअर टिम यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे