ब्रेकिंग

जैन स्पोर्टस अॕकडमीच्या समर कॕम्प -2024 चा समारोप..

जळगाव( प्रतिनिधी) – ‘आरोग्यपूर्ण डायट, नैतिकता, शिस्त आणि सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्पचे आयोजन खुप महत्त्वपूर्ण ठरले. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपिठ उपलब्ध करून खेळ, खेळाडूंचे भवितव्य घडविले जात आहे, यासाठी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन सदैव प्रयत्न करत आहे. ‘ असे मनोगत रणजीपटू समद फल्लाह यांनी व्यक्त केले.

जैन स्पोर्टस ॲकडमीचा समर कॕम्प -2024 चा समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय कॕरम खेळाडू आयशा मोहम्मद हिने प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून जैन परिवारातील अभंग जैन होते. सोबत आंतरराष्ट्रीय कॕरम खेळाडू आयशा मोहम्मद, संदीप दिवे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी रणजीपटू समद फल्लाह, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, जैन स्पोर्टस ॲकडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, सुनील व्यवहारे, आविनाश लाठी, संजय पवार उपस्थित होते.

जैन इरिगेशन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, कांताई नेत्रालय यांच्या सहकार्याने दि.15 एप्रिल ते 18 मे पर्यंत समर कॕम्पचे आयोजन केले होते. क्रिकेट, बॕडमेंटन, बुध्दिबळ, बास्केटबाॕल, तायक्वांदो, फुटबाॕल या खेळांमध्ये 410 खेळाडूंनी सहभाग घेतला. अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेंकडरी, कांताई सभागृह याठिकाणी समर कॕम्प चे आयोजन केले होते.

2023-24 या वर्षात जे खेळाडू यशस्वी झाले अशा 101 खेळाडूंचा गौरव केला गेला.सुयश बुरूकुल यांनी समर कॕम्प विषयी सांगितले. सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले.

समर कॕम्प मधील यशस्वी खेळाडू

समर कॕम्पमध्ये बॕडमेंटनमध्ये उत्कृष्ट खेळाडू राखी ठाकूर, गणेश पंडीत,मोकक्षा जाखेटे, शोनब माहेश्वरी, बाॕस्कटेबाॕल रिशीता वाणी, चंद्रविर परदेशी, युदीप लाडवंजारी, विरेन वसराणी, गार्गी वाणी, पुर्वा हटकर, कॕरममध्ये धृव बारी, धिरज घुगे, बुध्दिबळ राघव वाघळे, हर्षदा पाटील, पुनित वारके, विद्या बागुल फुटबाॕलमध्ये कार्तिक पाटील, दर्श बडगुजर, आरव सोनी, चेतन चौहान, निखील साळुंखे, तायक्वांदो मध्ये तनिया सुतार, वंश सोनवणे, कोमल घढे, दर्शन कांडवे, सिमरण बोरसे, तर क्रिकेट मध्ये उत्कृष्ट फलंदाज दर्शन पवार व विशाल चौधरी, उत्कृष्ट गोलंदाज रितेश हिवरकर व निर्भय घुगे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अंश लोणकलकर, स्वामी खंबायते, उत्कृष्ट देहबोली हिमांशु चौधरी व अर्थव पांढरे, उत्कृष्ट परिक्षार्थी पुष्कर बुवा, उदयोमुख खेळाडू आर्यन पाटील याला चषक, बॕट, ग्लोज दिले. तर समर कॕम्प मधील बेस्ट ट्रेनी रोहन चौधरी याचा चषक, बॕट, ग्लोजसह हेल्मट संपूर्ण किट देण्यात आले.

समर कॕम्प मध्ये जैन स्पोटर्स ॲकडमीमधील सर्व प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे