महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पवारांच्या लेकिला लाभली खडसेंच्या लेकीची साथ..

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा पवारांनी बंड केलं त्यांच्या सोबत अनेक नेते ,आमदार शरद पवारांना सोडून गेले राष्ट्रवादी फुटली… तेव्हा श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी

या ओळी म्हणत सुप्रिया सुळेंनी पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार करत फुटीर गटाविरोधात हुंकार भरला.आणि पक्ष संघटना बांधणीसाठी सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या साथीने राज्यभर दौरे करून पक्षाची बाजू मांडली व व कार्यकर्त्याना उभारी दिली

त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तर्फ़े त्यांनी उमेदवारी केली त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून उमेदवार होत्या

या लढतीत मतदार संघात केलेली विकास कामे आणि पक्षाचे ध्येय धोरणे मतदारां पर्यंत पोहचवत बारामती लोकसभा मतदारसंघात स्वतःचा प्रचार सांभाळून त्यांनी इतर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभा घेतल्या व महायुतीच्या विरोधात रणशिंग फुंकले यात त्यांना पक्षातील इतर महिला नेत्यांची उत्तम साथ लाभली यामध्ये खा वंदना चव्हाण, फौजिया खान, रोहिणी खडसे, सक्षणा सलगर व इतर महिला नेत्यांचा समावेश आहे

विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी

विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटिल यांच्या सोबत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काम करत असुन भविष्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचा ठाम निर्णय जाहिर करत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात दौरे करून त्यांनी सभा, कॉर्नर सभा, गाठीभेटी ,प्रचार रॅली द्वारे सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न महिलांची असुरक्षितता ,बेरोजगारी यावर कडक प्रहार करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ध्येय धोरणे, शरद पवार यांचे कार्य, पक्षाच्या जाहीरनाम्यातील आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या योजना मतदारांपर्यंत पोहचवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले

यात प्रामुख्याने वर्धा, नागपुर, रामटेक, भंडारा गोंदिया, धुळे ,दिंडोरी, शिरूर ,बारामती ,शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा मतदारसंघातील खडसकवासला विधानसभा क्षेत्राचा दोन दिवसीय दौरा करून

बारामती लोकसभा मतदारसंघात

खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पवार विरुद्ध पवार अशा हायव्होल्टेज मुकाबल्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभागी होऊन सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला

रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार आपल्या वहिनी खासदार रक्षाताई खडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या प्रचारात आणि निवडणुकीच्या रणनीती मध्ये सक्रिय सहभाग घेतला मुक्ताईनगर येथे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे अध्यक्ष खा .शरद पवार यांच्या भव्य प्रचार सभेचे नियोजन केले

यावरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पवारांच्या लेकिला खडसेंच्या लेकीची साथ लाभल्याचे व सह्याद्रीच्या लेकीसाठी सातपुड्याची लेक प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसुन आले

राज्यभर केलेल्या प्रचार दौऱ्यांचा रोहिणी खडसे यांना भविष्यात आपल्या राजकीय वाटचालीत निश्चितच फायदा होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे