गालापूर येथे लोकसहभागातून वनराई बंधारा..

गालापूर – दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मीनल करणवाल,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव. भाऊसाहेब अकलाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली गालापूर येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. अतिशय कमी खर्चात लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आडविणे शक्य झाले यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते, वन्य प्राणी, पाळीव प्राणी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली
यावेळी एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव, दीपक अत्तरदे, शाखा अभियंता. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेख आरिफ शेख सब्दर, विनोद महाजन सामाजिक कार्यकर्ते, बापू मोरे, रमेश पवार ग्राम पंचायत अधिकारी, महाजन सर केंद्रप्रमुख, नंदलाल पाटील मुख्याध्यापक व त्यांचे शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका ग्रामस्थ व ग्राम पंचायत कर्मचारी रोहिदास सोनवणे निकेश खैरनार ग्राम रोजगार सहाय्यक, किशोर महाजन संगणक परिचालक सचिन महाजन इत्यादी उपस्थित होते
ईतर महत्वाच्या बातम्या
बांभोरी पुला जवळ नदी पात्रात वाळू माफियांचा धुमाकूळ : भरदिवसा सर्रास वाळू चोरी..
वाळू वाहतुकीसाठी 73 हजाराची लाच : तलाठ्या सह कोतवाल व पंटर ACB च्या जाळ्यात..
अनुदानित आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी मनसेचा तीव्र संताप..