एरंडोल

आडगाव येथील वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्पाची अधिकाऱ्यांनी केली पाहणी : अनेक गावासह शेतकऱ्यांना फायदा..

एरंडोल – केदारनाथ सोमाणी 

येथुन जवळचं असलेल्या आडगाव ता.एरंडोल येथील वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्पकांची पाहणी उपविभागिय जलसंधारण अधिकारी मूर्णशा वैलचावला , जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळकृष्ण ढंगारे , जलसंधारण अधिकारी नितीन राठोड , विशाल शिंदे यांनी  प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली . या प्रकल्पासंदर्भात आडगाव येथील कृती समितीने तालुक्याचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्याशी भेट घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता . वरिष्ठाचे आदेश प्राप्त झाल्याने जलसंधारण अधिकारी यांनी ताबडतोब जाऊन वाध्याबर्डी जलसिंचन प्रकल्पाची पाहणी केली . या सिंचन प्रकल्पाचा आडगाव , कासोदा , उमरे , मालखेडा सह बऱ्याच गावांचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण दिसून आले .

हा प्रकल्प अनेक वर्षापासून विचाराधीन आहे .परंतू अमलबजावणी होत नाही . गिरणा सिंचन प्रकल्प असला तरी बऱ्याच शेतकरी वर्गाला फायदा होत नाही म्हणून वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्प होणे गरजेचे आहे . कासोदा आडगाव परिसराला पिण्याच्या पाण्याची समस्या खूप मोठया प्रमाणावर आहे म्हणून या प्रकल्पाचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे . मुख्यमंत्री महोदय यावर सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आहे . सिंचनाची पाहणी करतेवेळी शिष्टमंडळातील सरपंच सुनिल पवार , ग्रां प सदस्य प्रल्हाद पाटील , प्रविण पाटील , मार्केट कमेटी संचालक सुदाम पाटील ग्रा प सदस्य रविंद्र पवार , रावसाहेब पाटील . जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर उपस्थित होते . अधिकारी वर्गाने सकारात्मक भूमिका घेऊन शासनाकडे अहवाल लवकर पाठविला जाईल असे मत व्यक्त केले . शेवटी आभार प्रल्हाद पाटील यांनी मानले .

ईतर महत्वाच्या बातम्या 

जळगावात गावठी कट्ट्यासह एकास LCB कडून अटक..

चोपड्यात वडिलांकडून मुलीवर व जावयावर गोळीबार..

जळगाव हादरले तरुणावर अंदाधुंद गोळीबार..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे