
एरंडोल – पोलीस स्टेशन च्या पोलीस हवलदारास 3 हजाराची लाच घेतांना धुळे एसीबी ने रंगेहाथ पकडले असून बापु लोटन पाटील, पोलीस हवालदार, एरंडोल असे त्यांचे नाव असून सदर करवाई मुळे लाचखोरांच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे म्हसवे ता. पारोळा येथील रहिवासी असुन त्यांचेविरुध्द एरंडोल पोलीस स्टेशन येथे दि. ०१.०९.२०२५ रोजी अपघाताचा गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयाच्या तपासकामी तक्रारदार यांची मोटार सायकल जमा करण्यात आली होती. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवलदार बापु पाटील हे करीत होते. दरम्यान तकारदार यांनी त्यांची मोटार सायकल परत मिळणेकरीता आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन एरंडोल चे पोलीस हवलदार बापु पाटील यांची दि. १६.१०.२०२५ रोजी भेट घेतली असता पोलीस हवलदार बापू पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे गुन्हयात जमा केलेली त्यांची मोटार सायकल सोडण्यासाठी ३,०००/- रुपये लाचेची मागणी केली असल्याची तकारदार यांनी दुरध्वनीव्दारे माहिती दिली होती. सदर माहितीवरुन धुळे ला.प्र. विभागाच्या पथकाने एरंडोल येथे जावुन तकारदार यांची तकार नोंदवुन घेतली.
सदर तक्रारीवरुन पडताळणी केली असता पोलीस हवलदार बापु पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष ३,०००/- रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर कारवाई दरम्यान पोलीस हवलदार बापु पाटील यांनी तक्रारदार याच्याकडुन ३,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
सदर कारवाई
धुळे एसीबी चे पोलीस उप अधीक्षक,सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे,पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल,पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.