जळगाव

बालरंगभूमी परिषद तर्फे सर्व कला व लोककलांच्या महास्पर्धा घेण्याचे नियोजन..

बालरंगभूमी परिषद संस्कारासोबत कला शिक्षणाचे कार्य करणार - अभिनेत्री नीलम शिर्के

 

जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना कालावधीत मुले ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, टॅब, लॅपटॉप या गॅझेटमध्ये अडकलेली आहेत. त्यामुळे मुलांचे मैदानी खेळ तसेच सर्व कलाप्रकारांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच मातृभाषा मराठीत संवाद साधण्याचे कौशल्य देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे कमी झालेले आहे. या सर्व मुलांना त्यांच्या मूळ बालपणाकडे, आजोबा आजींच्या गोष्टींकडे वळवून त्यांच्यात संस्कार रुजविण्याचे काम बालरंगभूमी परिषद करते. आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकांना कलाप्रकारांसह, पारंपारिक वाद्ये यांची ओळख करवून देण्यात येणार आहे. तसेच राज्यात बालरंगभूमी संमेलन घेण्यात येणार असल्याचे बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के यांनी सांगितले.

बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नीलम शिर्के या राज्याचा दौरा करून राज्यातील २५ शाखांना भेट देवून, त्या त्या ठिकाणच्या बालकलावंतांशी, पालकांशी व बालरंगभूमी परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेत आहेत. शुक्रवारी बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, बालरंगभूमी परिषदेची स्थापना पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच आलेल्या कोविड कालावधीत लॉकडाऊनमुळे प्रत्यक्षात कार्य झाले नाही. मुलांसोबत ऑनलाईन संपर्क होता. मात्र आता नव्याने कार्य सुरु करुन बालरंगभूमी परिषदेच्या कार्याला गती देण्याचे ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील ११ शाखांना मी भेट दिली आहे. परिषदेच्या शाखा कार्यान्वित करण्यासह त्या अधिकाधिक कार्य कशा करतील यासाठी आता प्रयत्न करणार आहे. बालकलावंत घडविण्यासोबतच बालप्रेक्षक घडविण्यासाठी काय करता येईल यासाठी उहापोह करुन, त्यावर चर्चा सुरु आहे. बालरंगभूमी परिषदेच्या शाखा विविध कार्यशाळा व महोत्सव घेण्यासोबतच स्पेशल चाईल्डसाठीही कार्य करणार आहेत. त्यांच्या कलागुणांना सादर करण्याची संधी त्यांना देण्यात येणार आहे.

मुलांच्या हातातून मोबाईल सुटून त्यांना कलाप्रकारांकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. बालसंस्कार शिबिरात जावून मुलांवर संस्कार घडवावे लागतात हे आपले दुर्दैव आहे. कलेच्या माध्यमातून मुलांचा केवळ बौध्दिक विकासच नाही तर त्यांना चारचौघात बोलण्याचा समाधीटपणा, प्रसंगावधान, स्मरणशक्ती वाढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य बालरंगभूमी परिषद करणार आहे. बालकांसोबत पालकांचेही समुपदेशन करण्यात येणार असून, आगामी काळात बालनाट्य स्पर्धा, लोककला महोत्सव शाखांद्वारे घेतला जाणार आहे. या बालनाट्य स्पर्धात रंगमंचावर व रंगमंचामागेदेखील बालकलावंतच भूमिका निभावणार आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून बालकलावंत व बालप्रेक्षक घडल्यानंतर, राज्यस्तरावर महास्पर्धा व महोत्सवाच्या माध्यमातून या बालकलावंतांना राज्यपातळीवर रंगमंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांसोबत पालकांनीही बालरंगभूमी परिषदेचे सभासद होण्याचे आवाहन अभिनेत्री नीलम शिर्के यांनी केले.

बालरंगभूमी संमेलनाचे दरवर्षी आयोजन

१०० व्या अंतिम अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे रत्नागिरी येथे आयोजन होणार आहे. हे नाट्यसंमेलन सहा दिवसांचे असून, यातील तीन दिवस हे बालनाट्याला देण्यात आले आहेत. तसेच दरवर्षी बालरंगभूमी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून, वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखेला या संमेलन आयोजनाचा मान मिळणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला मध्यवर्तीच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत, जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांच्यासह मध्यवर्ती शाखेचे कार्यकारिणी सदस्य, राज्यातील शाखांचे पदाधिकारी तसेच जळगाव शाखेचे पदाधिकारी, आजीव सदस्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

इतर महत्वाच्या बातम्या…..

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके..

पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांची काठीवाडी पशुपालकांना भेट

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे