महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस…
Weather update (मुंबई) – काल माॅन्सूनने राज्यात प्रवेश केल्यानंतर आज त्याच जागेवर मुक्काम केला. आज माॅन्सूनने प्रगती केली नाही. पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. तर पुढील ४ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
माॅन्सूनने काल राज्यातील सिंधुदूर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा व्यापला होता. तसेच रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात माॅन्सून दाखल झाला. तसेच कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात माॅन्सूनने प्रगती केली. अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागरात बहुतांशी भागात माॅन्सून पोचला. माॅन्सूनची सिमा आजही रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयानगरम भागात होती.
माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून महाराष्ट्राचा आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापेल असाही अंदाज आहे. तसेच तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग माॅन्सून व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
Weather update: या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागात पुढील ४ चार दिवस पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. आज बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके..
पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण..