सेतू चालकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्यासाठी एक दिवसीय संप..
लाडकी बहिण योजनेचे कमिशन कधी व कसे मिळणार - सेतू चालकांचा सवाल
रावेर (हमीद तडवी)- रावेर येथे सेतू सुविधा केंद्र चालकांचे तहसीलदारांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.लाडकी बहिण योजनेसह आतापर्यंत केलेल्या काही योजनांचे कमिशन कसे व कधी मिळणार तसेच विविध अडचणी व समस्या सोडविण्याच्या मागणी साठी आपले सरकार सेवा केंद्र चालक व सीएससी केंद्र चालकाच्या आज येथे एक दिवसीय संप पाळण्यात आला.सुमारे १० योजनांचे कमिशन अजूनही मिळाले नाही
शासनातर्फे नवनवीन योजना घोषित होतात. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सेतू चालकांना सक्ती केली जाते मात्र त्या ,मोबदल्यात सेतू चालकांना जर कमिशन किंवा मानधन मिळत नसेल तर काम करावे कसे असा सवाल सेतू चालक करीत आहे.
सन २०१२ व २०१४ पासून ते आज तागायत सेतू चालकांच्या कमिशन मध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच शासनाच्या विविध योजना जसे की कर्जमाफी, दुष्काळ अनुदानाची केवायसी, शासकीय दाखले, आयुष्मान सेवा, श्रम कार्ड, मतदान कार्ड, पिक विमा योजना, आधार कार्ड सेवा, आयकर सेवा आदी सेवांचे आजपर्यंत मानधन / कमिशन शासनाकडून मिळाले नाही.
त्यामुळे “माझी लाडकी बहिण योजना” या योजनेचे फॉर्म भरावयास केंद्र चालक तयार आहे. तो अर्ज परिपूर्ण ऑनलाईन व ऑफ लाईन भरून सरकार दरबारी दाखल करावा लागणार आहे. त्यासाठी सेतू चालकांना दुकान भाडे, पेन, कागद, वीज बिल, इंटरनेट आदी खर्च लागू आहेत. असे असूनही कमिशन कसे मिळणार याबाबत कुठल्याही ठोस लेखी सूचना नाहीत व तशी सेतूच्या पोर्टल मध्येही माहिती उपलब्ध नाही. म्हणून या योजनेचे मानधन सुद्धा आधीच्या काही योजनांप्रमाणे मिळणार नसल्याचे दिसत आहे. तसेच मानधन मिळणार नसल्याचे दिसत असल्याने सेतू चालकाने बहिणींकडून फी घेतल्यास गुन्हे दाखल होणार असल्याने मोफत कसे काय सेतू चालक काम करणार. असाहि सवाल सेतू चालक करीत आहे.तरी लाडकी बहिण योजनेचे मानधन प्रती अर्ज किमान रु. १०० द्यावेत व ज्या योजनांचे जमिषण मिळाले नसेल ते त्वरित मिळावे. व संभ्रम दूर करावा अशी मागणी सेतू चालक करीत आहे.
सदर मागणीचे निवेदन तहसिलदार बंडू कापसे यांना देण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे व वरिष्ठ लिपिक प्रवीण पाटील उपस्थितहोते.
निवेदनावर सेतू सेवा केंद्र चालक अध्यक्ष धनराज घेटे, नकुल बारी, संतोष पाटील, निलेश नेमाडे, प्रदीप महाजन, विजय पाटील, प्रदीप पाटील, राहुल गाढे, वैभव तायडे, अमोल बारी, चेतन बारी, राजेंद्र अटकाळे आदींच्या सह्या आहेत. यावेळी सर्व सेतू सुविधा केंद्र चालक उपस्थित होते.निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी जळगाव यांनाही पाठविण्यात आली आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न; नविन कार्यकारिणीची घोषणा..