रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष शेखर मेहता यांच्या उपस्थितीत रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा होणार संपन्न…
अमृत महोत्सवी वर्षात फिजिओथेरपी रुग्णालयाचा मानस - अध्यक्ष ॲड.सागर चित्रे यांची माहिती
जळगाव दि.८ जुलै – अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या रोटरी क्लब जळगावच्या पदग्रहण सोहोळ्यास रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष शेखर मेहता उपस्थित राहणार असून प्रांतपाल राजिंदरसिंग खुराणा, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, सहायक प्रांतपाल उमंग मेहता यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष ॲड. सागर चित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी मानद सचिव पराग अग्रवाल,सहप्रांतपाल जितेंद्र ढाके, जनसंपर्क समिती प्रमुख गिरीश कुलकर्णी, योगेश गांधी रितेश जैन, राजेश यावलकर उपस्थित होते.
बुधवार, दि. १० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता रोटरी भवन, मायादेवी नगर येथे हा पदग्रहण सोहळा होणार आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० तील अनेक माजी प्रांतपाल व पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब जळगाव हा शहरातील प्रथम स्थापन झालेला क्लब असून यावर्षी क्लब आपला अमृत महोत्सव साजरा करीत आहे, अशी माहितीही सागर चित्रे यांनी दिली.
अमृत महोत्सवी वर्षात क्लबने समाजोपयोगी उपक्रमात नाममात्र दरात फिजिओथेरपी रुग्णालय उभारण्याचा मानस आहे. यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्थांशी संपर्क सुरु असून लवकरच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. तसेच महिला सबलीकरणासाठी म्हणुन ५ गरजू व निराधार महिलांना प्रशिक्षण देऊन विनामूल्य रिक्षा देण्याचा क्लबचा प्रयत्न करणार आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी म्हणुन अमृत महोत्सवी व्याख्यानमामाले अंतर्गत वर्षभरात तीन नावाजलेल्या व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. यात दि. १५ ऑगस्ट २४ रोजी ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ आनंद नाडकर्णी यांचे पहिले व्याख्यान होणार असून विवेक घळसासी यांचेसह अन्य मान्यवरांशी संपर्क सुरु आहे.
रोटरी क्लब जळगावने मागील ७५ वर्षात वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले आहे. अमृत महोत्सवी वर्षात जामन्या गाडर्या या आदिवासी भागात सर्व प्रकारच्या भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. क्लबने आपल्या सदस्यांना आपल्या बालपणाचा आनंद देण्यासाठी बचपन ही मध्यवर्ती संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे, असे मानद सचिव पराग अग्रवाल यांनी सांगितले.
ईतर महत्वाच्या बातम्या
सेतू चालकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्यासाठी एक दिवसीय संप..
इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न; नविन कार्यकारिणीची घोषणा..