कारगील विजय दिनाचे औचीत्य साधुन रक्तदान शिबीर संपन्न..
जळगाव – दि.२६ रोजी कारगील विजय दिनाचे औचीत्य साधुन जळगाव जिल्हा पोलीस दल व इंडीयन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांचे संयुक्त विद्यमानाने पोलीस अधीकारी व कर्मचारी याच्या साठी मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे सकाळी ०९:०० ते १४:०० वा. दरम्यान रक्तदान शिबीराचे आयोजन डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. सदर रक्तदान शिबीरात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधीकारी, तसेच राखीव पोलीस निरीक्षक यांचे सह शहरातील व जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधीकारी कर्मचारी यांनी रक्तदान करून सदर शिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद देवून एकुण १०४ बॅग रक्त संकलीत करण्यात आले. सदर प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,यांचे सह अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रमोद पवार , उपविभागीय पो. अधीकारी, संदीप गावीत, पोलीस निरीक्षक, दिपक बुधवंत, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार तसेच इंडीयन रेडक्रॉस सोसायटी चे पदाधिकारी उपस्थित होते. सदर शिबीराचे आयोजन पो. उपनिरी. रेश्मा अवतारे, रा. पो. उपनिरी. मंगल पवार, रा.पो.उपनिरी. रामेश्वर सोळंके, पो. उपनिरी. देविदास वाघ, पो.उप. निरी. रावसाहेब गायकवाड, पोहेकॉ- सतिष देसले यांनी परिश्रम घेतले.