जळगांव येथे वनविभागा तर्फे जागतिक व्याघ्र दिना निमित्त जनजागृती कार्यक्रम…
जळगाव – वाघ्र दिना निमित्त रविवारी सकाळी शारदाश्रम विद्यालय शिव कॉलनी, कोल्हे नगर पश्चिम येथे राबविण्यात आला, तसेच जळगांव व यावल वनविभागातील अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगांव येथून मान्यवर व 150 व्याघ्रदूतांच्या उपस्थितीत 2 दिवसीय जनजागृती रॅली निमित्त रॅली काढण्यात आली. सदर दोन दिवसीय रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला, त्यानंतर पहिल्या दिवसाच्या जनजागृतीपर नशिराबाद, भुसावळ, मुक्ताईनगर, डोलरखेडा, वायला, सुकळी, दुई व परिसरातील गावांमध्ये पथनाटय सादरीकरण, मानवी वाघ, माहिती पत्रकाचे वाटप करुन वाघ वाचवा, जंगल वाचवा च्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.
तसेच पर्यावरण सक्षमीकरण समितीचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, स्कायनेटचे उदय पाटील, शिवराज पाटील, संजीव साटले, दिशा फाउंडेशन, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संतोष इंगळे, सचिव अमळकर, समीर साने आणि 150 व्याघ्रदूतांच्या जागतिक व्याघ्र दिना निमित्त जळगांव जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपस्थित राहुन कार्यक्रम राबविण्यात आला.
तसेच दि.29 रोजी रावेर येथे जमीन एम.शेख उपवनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगांव यांच्या हस्ते वाघ्र संवर्धन जनजागृती दिना निमित्त जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात येणार असून मौजे कुसुंबा, लालमाती, सहस्त्रलिंग, पाल येथे जनजागृतीपर कार्यक्रम व पथनाटयाचे आयोजन करुन पाल येथे व्याघ्र दिनाची समारोप करण्यात येईल.
यावल वनविभागात सुध्दा वाघाचे दर्शन बघावयास मिळतो, यावल वनविभागात वाघ हा ट्रॅप कॅमेरामध्ये सुध्दा कैद झालेला आहे, जंगल हे वाघाचे घर असून जंगला मध्ये निसर्गाने प्रत्येक प्राण्यांची अन्न साखळी निर्माण केली आहे.वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च घटक असून राष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या अनुषंगाने काढण्यात येणाऱ्या वाघ जनजागृती रॅलीमुळे वाघाचे जनसामान्यामध्ये महत्व पटवून वाघ संवर्धनामध्ये भर पडून मोलाचे कार्य ठरेल.
जमीर एम. शेख (उपवनसंरक्षक,यावल वन विभाग, जळगांव)
सदर कार्यक्रमास आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जमीन एम.शेख उपवनसंरक्षक, यावल वन विभाग, रविंद्र फालक अध्यक्ष वन्यजीव संस्था राजेंद्र नन्नवरे , भरत अमळकर यांची उपस्थिती होती.
ईतर महत्वाच्या बातम्या