राज प्राथमिक-माध्यमिक विदयालय व डॉ सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज मेहरूण येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..


जळगाव – मेहरूण परिसरातील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मा. श्री.अनिलजी पगरिया (चेअरमन जैन सोशल ग्रुप गोल्ड, जळगाव) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी माजी महापौर सौ.जयश्रीताई महाजन (जळगाव मनपा), मा.श्री.जितेंद्रजी बोहरा, संस्थेचे सचिव मा.श्री.ललीतभाऊ धांडे, संस्थेचे संचालक मा.श्री.अनिलदादा पाटील, मा.श्री.ज्ञानेश्वरदादा नाईक, मुख्याध्यापक मा.श्री.चंद्रकांत पाटील सर हे मान्यवर तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
शाळांतर्गत स्पर्धामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी वाटप करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. तसेच खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.एस.एस.सुरवाडे सर यांनी तर आभार प्रदर्शन मा. श्री पी.डी.नेहेते सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.