जळगाव जिल्हा

देवझिरी शिवारात तुरीच्या पिकाआड गांजाची शेती : १७५ झाडे जप्त..

एमपी बॉर्डरलगत अडावद पोलिसांची कारवाई : देवसिंह बरेला ताब्यात..

जळगाव – जिल्ह्यातील अडावद पोलिस स्टेशन हद्दीतील देवझिरी गावाच्या शेतशिवारात तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी कारवाई करत गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त केली असून, याप्रकरणी देवसिंह बरेला याला ताब्यात घेतले आहे.

दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. डीवायएसपी सुनील पाटील तसेच अडावदचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने देवझिरी गावातील शेतशिवारात कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित शेतात तुरीचे पीक घेण्यात आले होते. याच तुरीच्या पिकाच्या आड गांजाची झाडे लावण्यात आली होती. पोलिसांनी शेताची पाहणी करून गांजाची १७५ झाडे जप्त केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे देवझिरी गावाचे शेतशिवार मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असल्याने या भागात अमली पदार्थांच्या लागवडीसंदर्भात पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड करून ती लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी आरोपी देवसिंह बरेला याला ताब्यात घेतले असून, जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांची किंमत व वजन निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, गांजाची लागवड कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली आणि त्याची विक्री कुठे केली जाणार होती, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे