जळगाव

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ : रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा..

जळगाव : समाजसेवेच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. जळगाव शहरातील रोटरीच्या भैय्यासाहेब नथमलजी लुंकड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रोटरी असिस्टंट गव्हर्नर ॲड. सागर चित्रे, माजी प्रांतपाल डॉ. सिकची, नाना शेवाळे, राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते रोहित आहुजा यांनी क्लबचे चार्टर प्रेसिडेंटपद स्वीकारले. तसेच धनराज कासट व पुनीत तरलेजा यांनी चार्टर सेक्रेटरीपदाची जबाबदारी स्वीकारली.चालू वर्षासाठी क्लबच्या Board of Directors (BoD) ची निवडही यावेळी करण्यात आली. यामध्ये ट्रेझरर सीए सौरभ शाह, व्हाईस प्रेसिडेंट सरिता झावर, तसेच पूनम वर्मा, योगेश सांखला, निकुंज अग्रवाल, विनीत आहुजा, दर्शन जैन, पराग बेदमुथा, मयूर ओसवाल, तुषार भांबरे, प्रकाश मुळे आणि डॉ. महेंद्र मल्ल यांचा समावेश आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांना क्लबचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून क्लबची सदस्यसंख्या ६२ झाली आहे. यामध्ये ११ महिला सदस्यांचा समावेश आहे. आगामी काळात जळगाव शहर व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रम राबवून समाजासाठी अधिकाधिक योगदान देण्याचा मानस क्लबच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला.नवीन क्लबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून गरजूंसाठी काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे