म्हसावद गावात ट्राफिक मुळे नागरिक व शेतकरी वैतागले..
(म्हसावद प्रतिनिधी – सलीम शाह)
जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथे काही वर्षा पासून उड्डाण पुलाचे काम चालू आहे धरणगाव व म्हसावद या दोन्ही गावाचे उड्डाण पुलाचे काम सोबत चालू झाले होते
काही वर्षातच धरणगाव या गावाचे उड्डाण पुलाचे काम पूर्ण पणे झाले व तो उड्डाण पूल जुना पण होऊन गेला, तरी म्हसावद गावाचे उड्डाण पुलाचे काम अजून काही पुरेसा झालेला नाही. या उड्डाण पुलामुळे म्हसावद चे नागरिक वैतागले आहे, कारण या गावात सकाळी संध्याकाळी इतकी ट्राफिक जाम होते कि नागरिकांना, महिलांना जाण्यायेण्यासाठी रस्ताच राहत नाही शेतकरी यांचे बैलगाडे, गायी, म्हशी यांना जाण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही. या मार्गांवर मराठी शाळा, उर्दू शाळा स्टेट बँक, सेतू केंद्र, सरकारी दवाखाना सगळ्या या मार्गांवर आहे लहान मुलं, महिला यानां रस्ता सुद्धा ओलांडता येत नाही येवडी धोका दायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. गिरणा नदी पूल ते रेल्वे गेट पर्यंत थेट वाहनाचे रंगाचं रांगा लागतात. म्हसावद गावाचे नागरिक कितीक वर्षा पासून हे त्रास सहन करत आहे,
हे म्हसावद करच सांगू शकता. या मार्गांवर अवजड वाहन लोडींग कंटेनर, वाळू चे ढम्पर अशा ओरलोड वाहने चालतात या रस्त्याने एक तर्फी ट्राफिक सुरु केल्या मुळे वाहणांना अडचण निर्माण झालेली आहे या रस्त्याने मोट मोठे गड्डे पडलेले आहे व या गड्यांमुळे मोट्या प्रमाणात पाणी साचलेले आहे या मोट्या गड्यांमुळे दुर्घटना होऊ शकते या रस्त्याने लहान मोठे वाहन चालतात व लहान वाहन्ना कट वैगरे लागतोच तरी शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन हि समस्या मार्गी लावावी. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.