जळगाव

जळगावात उद्यापासून चार दिवस रंगणार खान्देश महोत्सव २०२६..

बचत गटांना प्रोत्साहनासाठी महोत्सवाला जळगावकरांनी एक दिवस भेट द्यावी : महापौर दीपमाला काळे 

जळगाव प्रतिनिधी : स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सागर पार्क येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पार पडणार आहे. बचत गटांना प्रोत्साहनासाठी महोत्सवाला जळगावकरांनी एक दिवस भेट द्यावी, अशी माहिती महापौर दीपमाला काळे यांनी दिली आहे.

महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. महोत्सवाचे गुरुवारी दि. २६ रोजी संध्याकाळी ६ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते उदघाटन होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यसभेचे खा. उज्ज्वल निकम, खा. स्मिताताई वाघ, शहराचे आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, सीईओ मीनल करणवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित राहणार आहे.

या महोत्सवात खान्देशातील संस्कृती, खाद्यपरंपरा आणि हस्तकलेचे दर्शन घडणार आहे. महोत्सवात एकूण १८० स्टॉल्स असणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने विविध वस्तूंचा समावेश असेल. बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, ऑफिस आणि होम डेकोरेटिव्ह वस्तू, खान्देशी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी अस्सल खाद्यपदार्थ महोत्सवात आहेत.

केवळ खरेदीच नव्हे, तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांच्या उपस्थितीत ‘पैठणी, राणीहार आणि भेटवस्तू’ जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. गायक, समूह नृत्य आणि स्थानिक कलावंतांचे सादरीकरण होईल. लहान मुलांसाठी खास ‘गेम झोन’ आणि जादूगाराचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. महापौर दीपमाला काळे यांनी जळगावमधील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला भेट द्यावी आणि स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना खरेदीद्वारे पाठबळ द्यावे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे