जळगाव शहर पोलिसांची कारवाई चोरीच्या १९ दुचाकी केल्या हस्तगत..
जळगाव – शहर पोलिसांनी चोरीच्या १९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.जळगांव जिल्हयात मोटर सायकल चोरीचे गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने मो.सा. चोरीचे गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी जळगांव शहरातील शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन करुन मो.सा. चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने जळगांव शहरातील एम. एम मास्टर तिजोरी गल्ली येथुन चोरी झालेल्या दुचाकीचा शोध सुरू केला. गुन्हे शोध पथकाचा तपास चालु असतांना गुप्त बातमीदारां मार्फत मिळवुन व नेत्रम येथील कर्मचारी यांच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पडताळणी करुन घेवुन व त्याचेकडून फुटेज प्राप्त करुन जळगांव शहरातील चित्रा चौकात जळगांव शहर पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचला.
फुटेजमधील संशयित आरोपी आसिफ बशीर पटेल वय-३५ रा. दहीगांव ता. यावल यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे ताब्यात असलेली जिल्हापेठ पो.स्टे. येथुन चोरीस गेलेली १ मो.सा. काढुन दिली व जळगांव शहर पो.स्टे. येथे आणले असता त्याने शहर पो. स्टे हद्दीतील चोरुन नेलेल्या इतर १८ मो.सा. अशा एकुण १९ मो.सा. चोरल्याची व त्या यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे विकल्याची कबुली दिली. त्यास अटक केली असुन त्यावर यापुर्वी कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसुन जळगांव शहर पो. स्टे हद्दीत घडलेल्या १९ मो.सा. चोरीचे गुन्हे तसेच जिल्हापेठ पो. स्टे येथील २ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील सपोनि रामचंद्र शिकारे, उपनिरीक्षक राजु जाधव, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, संतोष खवले, उमेश भांडारकर, सतिश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकुर, पांचाळ, प्रणय पवार यांनी केली आहे.