जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या २० गाड्या केल्या जप्त..
शोध पथक बदलताच नवीन पथकाची दमदार कारवाई..
जळगाव – जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या 20 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन रा. धानोरा याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी गणेश सुभाष पाथरवट रा. वाघळूद, अविनाश सुनील पाथरवट रा. वाघळूद, शाहरुख रमतुल्ला खाटीक रा. लक्ष्मीनगर, जळगाव सुरेश उत्तम मोरे रा. वाघळूद यांच्यासह एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी करता त्यांनी आतापर्यंत २० दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अद्याप १८ दुचाकी हस्तगत केल्या असून २ रावेर येथे आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकातील सपोनि संतोष चव्हाण, महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, पोना. राजेश पदमर, पोकॉ. मिलींद सोनवणे, पोकॉ. राहुल पाटील, पोकॉ. अमितकुमार मराठे, पोकॉ. प्रशांत सैदाणे, पोकॉ. नरेंद्र दिवेकर, पोकॉ. प्रविण जाधव, पोकॉ. विकास पहुरकर यांनी केली.
ईतर महत्वाच्या बातम्या
जळगाव शहर पोलिसांची कारवाई चोरीच्या १९ दुचाकी केल्या हस्तगत..
मुजोर अधिकाऱ्यावर कारवाईसाठी पत्रकारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन….