जळगाव हादरले जामिनावर सुटताच तरुणावर जीवघेणा हल्ला..
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शाहूनगर परिसरात जामिनावर सुटून घरी जात असलेल्या तरुणावर अज्ञातांनी जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्याच्यासोबत असलेले वडील व भाऊ देखील जखमी झाले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
प्रतीक हरदास निंबाळकर (वय २४, रा. सिटी कॉलनी, कानळदा रोड, जळगाव) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे. बऱ्याच दिवसांपासून तो खुनाच्या आरोपाखाली जिल्हा कारागृहात होता. दरम्यान दि.२१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचा जामीन झाल्यावर जिल्हा कारागृहातून प्रतीकचे वडील हरदास निंबाळकर आणि भाऊ वैभव निंबाळकर हे त्याला घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना शाहूनगर भागातील एका हॉटेल जवळ आले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही पिता पुत्र खाली पडले.
यानंतर हल्लेखोरांनी प्रतीक निंबाळकर याला लोखंडी वस्तूने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले प्रतीकचे वडील आणि भाऊ यांनादेखील मारहाण केली. मारेकरी निघून गेल्यावर प्रतीक निंबाळकर याला त्याचे वडील व भाऊंनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ईतर महत्वाच्या बातम्या
जळगावात बायोडिझेल चे 2 टँकर जप्त :MIDC पोलीसांची कारवाई..
१ हजाराची लाच : नगर भूमापनचा खाजगी कर्मचारी ACB च्या जाळ्यात..