10 हजाराची लाच : शिक्षण विस्तार अधिकारी धुळे ACB च्या जाळ्यात..

धुळे – पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी यांना 10 हजाराची लाच घेतांना धुळे एसीबीने रंगेहाथ पकडले असून रोहिणी दत्तात्रेय नांद्रे,शिक्षण विस्तार अधिकारी,पंचायत समिती धुळे.असे त्यांचे नाव व पद आहे.
तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे, ता.जि. धुळे येथे प्रभारी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. दि.०७.०८.२०२५ रोजी रोहिणी दत्तात्रेय नांद्रे,शिक्षण विस्तार अधिकारी, यांनी सदर शाळेस भेट दिली असता विदयार्थ्यांची पट संख्या कमी असल्याने तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि.११.०८.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता रोजी रोहिणी दत्तात्रेय नांद्रे,शिक्षण विस्तार अधिकारी, यांनी स्वतःकरीता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर आज दि.१२.०८.२०२५ रोजी लाच लुचपत विभागाने सापळा रचला दरम्यान रोहिणी दत्तात्रेय नांद्रे,शिक्षण विस्तार अधिकारी यांनी पंचायत समिती, धुळे कार्यालयातील त्यांचे कक्षात सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडुन स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
सदर कारवाई –
धुळे एसीबी चे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे,पोलीस निरीक्षक,यशवंत बोरसे, पोनि. पद्मावती , पो.हवा. राजन कदम,मुकेश अहिरे,पो.कॉ.रामदास बारेला,मकरंद पाटील,चालक पो. कॉ. जगदीश बडगुजर यांनी केली.