स्मार्ट इलेक्ट्रिशन व कॉन्टॅक्टर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न..

जळगाव – दि. 10 रोजी जळगाव येथे स्मार्ट इलेक्ट्रिशन व कॉन्टॅक्टर बहुउद्देशीय संस्था जळगाव महाराष्ट्र राज्य संस्थेमार्फत इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ वाटपाचा कार्यक्रम खूप आनंदात तसेच जल्लोषाने संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित जळगाव शहराचे लाडके श्री राजू मामा भोळे यांनी इलेक्ट्रिशन बांधवां करता सेफ्टी बद्दल मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री कल्पेश बद्रीनाथ सोमानी उपाध्यक्ष प्रदीप नाना पाटील संस्थेचे सचिव कल्पेश प्रवीण खैरनार तसेच या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष रवींद्र प्रताप पाटील तसेच विनायक विष्णू अत्तरदे. रोशन मणियार जांगिर शहा गुड्डू भाई खान रवींद्र आगळे शरद पाटील राम जेऊरकर तसेच इतर इलेक्ट्रिशन कॉन्टॅक्टर तसेच पालक या कार्यक्रमांमध्ये बहुमूल्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला
उपस्थित कार्यक्रमांमध्ये जळगाव शहराचे इलेक्ट्रिकल दुकानदार यांची सुद्धा उपस्थिती होती त्यांनी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटपासाठी सहकार्य केले संस्थेचे सचिव श्री कल्पेश प्रवीण खैरनार यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले