जळगावात बायोडिझेल चे 2 टँकर जप्त :MIDC पोलीसांची कारवाई..
जळगाव – दि.१८ रोजी एमआयडीसी पोस्टे पोलीस निरीक्षक, संदिप पाटील यांना गुजरात राज्यातुन बायोडिझल भरलेले ०२ टँकर हे जळगाव मधुन माहामार्गाने जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने, गोपनिय माहिती ही संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधीकारी, जळगाव यांना दिल्याने त्यांनी पथक तयार करून कारवाई करणेसाठी सुचना दिल्या होत्या. संदिप पाटील पोलीस निरीक्षक यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन जळगाव शहरातुन जाणारा राट्रीय मार्ग क्रं. ६ वर ईच्छादेवी ते अजिंठा चौक येथे रात्रोवेळी गुप्त पाळत ठेवली असता, सदर पथकास रात्रीवेळी अजिंठा चौकात ०२ टँकर क्रं. GJ-१२/BT-४२८४ व क्रं. GJ-१२/BT-११८१ हे पकडून सदर टँकर चालक व क्लिनर यांचेकडे चौकशी करता, त्यांनी सदर टँकर मध्ये बायोडिझेल असल्याची माहिती देवून, कोणताही बायोडिझेल वाहतुकीचा परवाना नसल्याबाबत माहिती दिली. त्यामुळे दोन्ही टँकर हे पोलीस स्टेशनला आणुन हजर केले. सदर दोन्ही टँकर मधील बायोडिझल बाबत इंडियन ऑईल, जळगाव व सर्वोदय सव्हिस स्टेशन, जळगाव यांचे तज्ञांकडून तपासणी करुन घेण्यात आली असता, त्यांनी सदर टँकर मधील द्रव हा बायोडिझेल असल्याबाबत खात्रीशिर माहिती दिली. दोन्ही टँकरचा सविस्तर जप्ती पंचनामा पुरवठा निरीक्षण अधीकारी , तहसील कार्यालय, जळगाव यांनी केला आहे.
एका टँकर मध्ये अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचे व दुस-या टँकर मध्ये १५ लाख रुपये किंमतीचे बायोडिझल ज्वलनशील पदार्थ व दोन्ही टँकर असे एकुण ४७ लाखांचा मुद्येमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त केले आहे. दोन्ही गुन्हयात टँकर चालक व क्लिनर यांचे विरुध्द अत्यावश्यक वस्तु कायदा कलम १९५५ चे कलम ३ व ७ सह भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८९, १२५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालक व क्लिनर असे एकुण ०४ आरोपी १) सद्याम सैयद अकबर वय-२३ रा. बच्छाव, गुजरात २) क्लिनर सुलेमान इलीयास छेरेया रा. वरसाना कच राज्य गुजरात ३) चालक लतीफ भाई फकिर हिंगोरजा रा. कच्च गुजरात ४) क्लिनर ज्ञानेश्वर भारत शिजुळ वय-२१ रा. मेहकर ता.जि. बुलढाणा यांना अटक केले आहेत. सदर आरोपीतांना न्यायालयात हजर केले असता, दि.२०/०२/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी मिळाली आहे. सदर दोन्ही गुन्हयाचा तपास संदिप पाटील पोलीस निरीक्षक, तसेच पोहेकॉ राजेंद्र कांडेकर व पोहेको रविंद्र परदेशी असे करीत आहेत.
तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, मानवी आरोग्यास धोका पोहचवणा-या ज्वलनशिल पदार्थाची निष्काळजीपणाने अवैध वाहतुक करणारे किंवा बाळगणा-यांबाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, जेणेकरुन अशा गुन्हेगारांना वेळीच अटकाव करता येईल. तसेच खबर देणा-यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
ईतर महत्वाच्या बातम्या
१ हजाराची लाच : नगर भूमापनचा खाजगी कर्मचारी ACB च्या जाळ्यात..