जळगाव

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगावमध्ये प्रॉपर्टी एक्स्पोचे मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते शानदार उद्धाटन..

जळगाव – क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगावमध्ये प्रॉपर्टी एक्स्पोचे शानदार उद्धाटन वातानुकूलित डोममध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी महापौर दीपमाला काळे, आ. राजुमामा भोळे, नितीन लढ्ढा, सुनील झवर, क्रेडाई राज्य उपाध्यक्ष अनिशभाई शहा, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, उपाध्यक्ष व प्रॉपर्टी एक्स्पो हेड मनोज खिवसरा,उपाध्यक्ष अनिल आहेर, समन्वयक सागर शहा, सह समन्वयक अनंत ठाकरे, आयपीपी कृणाल पाटील, माजी अध्यक्ष उमेश वानखेडे, सतीश मोरे , ऋषभ जैन, ,सुशील बागड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गिरीश महाजन यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन मी पण नाशिककरच आहे असा उल्लेख केला व येणाऱ्या काळात नाशिकच योगदान विषद केलं. नाशिकला होणाऱ्या महकुंभचा उल्लेख करताना तेथील विकासात्मक काळाचा आढावा घेतला त्यामुळे क्रेडाई नाशिक मेट्रोचे हे प्रदर्शन जळगावसाठी किती महत्त्वाचे आहे व याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.यावेळी एक्स्पो समन्वयक सागर शाह यांनी प्रास्ताविक केले तर तुषार संकलेचा यांनी आभार मानले. महापौर दीपमाला काळे व आ. राजूमामा भोळे यांनी देखील मार्गदर्शन केले.

नाशिक हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रगतिशील शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिक ,शैक्षणिक ,आरोग्य तसेच कृषी यावर आधारित अनेक उद्योग संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. याच नाशिक मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अपरिमित संधी आहेत .या संधींची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे दिनांक 7 ते 9 मार्च दरम्यान जळगाव मधील सागर पार्क ग्राउंड येथे ॑नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले हवेची गुणवत्ता आणि पाण्याची मुबलकता याचे वरदान लाभलेल्या नाशिक मधील हवामान अनेकांना आकर्षित करते. तसेच मुंबई पुण्यापासून कमी अंतर आणि जगभरातील सर्व प्रमुख शहरांसोबत वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिक मधील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. चेन्नई- सुरत महामार्ग, नाशिक जवळ विकसित होत असलेले वाढवण बंदर यासोबतच नुकत्याच समृद्धी महामार्ग हा खानदेश एक्सप्रेसवे द्वारे जळगावला सहा पदरी रस्त्याने जोडण्याच्या घोषणेमुळे जळगाव आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे .

सुमारे 28 वर्षांपासून कार्यरत क्रेडाई ही राष्ट्रीय स्तरावरील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असून आजमीतिला देशातील 230 शहरांतील 13000 हून अधिक बांधकाम व्यावसायिक या संस्थेसोबत जोडले आहेत.

जळगाव येथे आयोजित या प्रदर्शनात नाशिकचे अनेक आघाडीचे विकसक सहभागी होणार असून फ्लॅट्स ,प्लॉट्स, फार्म हाऊस, शॉप्स ऑफिसेस यांचे असंख्य पर्याय इथे उपलब्ध असतील प्रदर्शनाचा लेआउट व व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी असून ग्राहकांच्या सोयीसाठी पूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रदर्शनाचे सह समन्वयक अनंत ठाकरे म्हणाले नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यामुळे नाशिक मध्ये लाखो भाविक आगामी दीड वर्षाच्या कालावधीत येणार आहेत . यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला परतावा मिळण्याची शक्यता अधिक आहे .यासोबतच विविध क्षेत्रातील उपलब्ध संधीमुळे देखील भविष्यातील गुंतवणूक म्हणजे नाशिक रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्सपोमध्ये नाशिक सोबतच इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या भागातील अनेक पर्याय उपलब्ध असून प्रदर्शनाचे प्रायोजक म्हणून अर्बन साईटस व सहप्रायोजक म्हणून क्रिश ग्रुप व ललित रुंगठा यांनी जबाबदारी स्वीकारली आहे

प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत असून प्रदर्शनास अधिकाधिक जणांनी भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आले आहे .

प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष , उदय घुगे , अंजन भालोदिया,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड, हंसराज देशमुख, ऋषिकेश कोते, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन,समीर सोनवणे, मनोज लाडानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर , सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य लाभले. तसेच क्रेडाई जळगाव चे अध्यक्ष दीपक सराफ, सचिव तुषार महाजन. यांचे देखील सहकार्य लाभले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे