जळगावकरांना नाशिकमध्ये ‘हक्काच्या घरा’ची संधी : क्रेडाई नाशिक मेट्रोचा भव्य ‘प्रॉपर्टी एक्स्पो’..

जळगाव (प्रतिनिधी): शैक्षणिक हब, वाईन कॅपिटल आणि पर्यटनाचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होणाऱ्या नाशिक शहरात गुंतवणुकीची मोठी संधी आता जळगावकरांच्या दारात आली आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे येत्या ७ ते ९ मार्च दरम्यान जळगावच्या सागर पार्क मैदानावर भव्य ‘प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील गुंतवणूकदारांना एकाच छताखाली नाशिकमधील घरांचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
नाशिक हे ‘गोल्डन ट्रँगल’मधील महत्त्वाचे शहर असून मुंबई, पुणे, जळगाव आणि सुरत या शहरांशी अवघ्या २०० ते ३०० किमीच्या कनेक्टिव्हिटीमुळे जोडलेले आहे. आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिकमध्ये पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू असून रस्ते आणि पुलांचे जाळे विस्तारत आहे. तसेच समृद्धी महामार्ग आणि खानदेश एक्सप्रेस-वेमुळे जळगाव ते नाशिक हे अंतर आता अधिक सुसह्य झाले आहे, अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली.
पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये स्वस्त गुंतवणूक
पुण्यात जमिनीचे भाव १० हजार प्रति स्क्वेअर फुटांच्या पुढे गेले असताना, नाशिकमध्ये आजही ३ ते १० हजार रुपये दराने गुंतवणुकीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. सेवानिवृत्तीनंतर स्थायिक होण्यासाठी किंवा शैक्षणिक सोयीसाठी जळगाव जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि उद्योजक मोठ्या प्रमाणात नाशिकला पसंती देत आहेत. नाशिकमधील गुंतवणुकीवर भविष्यात मोठा परतावा मिळण्याची शक्यता प्रदर्शनाचे सह-समन्वयक अनंत ठाकरे यांनी व्यक्त केली.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये:
स्थळ: सागर पार्क मैदान, जळगाव (पूर्णतः वातानुकूलित एसी डोम).
स्टॉल्स: २८ भव्य स्टॉल्स, २५ नामवंत बिल्डर्सचा सहभाग.
पर्याय: फ्लॅट्स, प्लॉट्स, फार्म हाऊस, शॉप्स आणि ऑफिसेस.
क्षेत्र: नाशिकसह इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी येथील प्रॉपर्टीज.
विश्वासार्ह व्यवहाराची खात्री
“क्रेडाई सदस्य म्हणजे विश्वासार्ह व्यवहार, हे समीकरण गेल्या २८ वर्षांपासून जपले आहे. जळगावमधील हे आमचे तिसरे प्रदर्शन असून येथे आंतरराष्ट्रीय स्तराचा ले-आउट पाहायला मिळेल,” असे समन्वयक सागर शहा यांनी नमूद केले. या प्रदर्शनाचे प्रायोजक ‘अर्बन स्टाईल्स’ तर सह-प्रायोजक ‘क्रिश ग्रुप’ आहेत, अशी माहिती मानद सचिव तुषार संकलेचा यांनी दिली.
प्रदर्शनाची वेळ आणि आवाहन
येत्या ७ ते ९ मार्च दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. नाशिकमधील गुंतवणुकीच्या संधी जाणून घेण्यासाठी आणि आपल्या बजेटमधील घर निवडण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष मनोज खिवंसरा, उदय घुगे, अनिल आहेर, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी परिश्रम घेत आहे प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत असून प्रदर्शनास अधिकाधिक जणांनी भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आले आहे
प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष मनोज खिवंसरा, उदय घुगे, अनिल आहेर, अंजन नालोदिया, आयपीपी कृणाल पाटील, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड, हंसराज शमुख, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, पाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन, समीर सोनवणे, मनोज बढानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई पुवा विंग नन्वयक आदित्य भातंबरेकर, सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत.