जळगाव

8 गावठी कट्ट्यांसह १० जिवंत काडतुस जप्त : जिल्हापेठ पोलिसांची कारवाई..

जळगांव – शहरात अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी  बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ८ गावठी पिस्तुलं आणि १० जिवंत काडतुसे असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अनिल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, काही तरुण शहरात गावठी कट्टे विक्रीसाठी येणार आहेत. पोलिसांनी तात्काळ पथके तयार केली. सुरुवातीला संशयावरून यश नन्नवरे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक कट्टा मिळून आला. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने ही शस्त्रे समाधान बळीराम निकम (रा. अंजाळे) याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य सूत्रधार समाधान निकम याला जामनेर तालुक्यातील नेरी येथून शिताफीने अटक केली.

अटक करण्यात आलेल्या समाधान निकम याच्यावर यापूर्वीही खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने ही शस्त्रे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर भागातून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी साखळी पद्धतीने तपास करत या टोळीतील इतर ५ साथीदारांनाही विविध ठिकाणांहून अटक केली आहे.

जप्त केलेला मुद्देमाल:८ गावठी पिस्तुलं,१० जिवंत काडतुसे,१ दुचाकी (क्र. MH 19 CM 1312),एकूण किंमत: ३ लाख १० हजार रुपये.

सदर कारवाई : पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल वाघ, उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, पोलीस कर्मचारी महेश महाजन, नरेश सोनवणे, संदीप परदेशी, भरत चव्हाण, राहुल पाटील, समाधान पाटील, तेजस मराठे, ईश्वर खवडे आणि नरेंद्र दिवेकर यांनी केली

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे