१ हजाराची लाच : नगर भूमापनचा खाजगी कर्मचारी ACB च्या जाळ्यात..
जळगाव – प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याच्या साठी १५ हजार लाचेची मागणी १००० रु. लाच घेताना खाजगी कर्मचारी, नगर भुमापन अधिकारी कार्यालय, जळगांव.( खाजगी इसम) अविनाश सदाशिव सनंसे यास जळगाव एसीबी ने रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याच्या साठी अविनाश सदाशिव सनंसे खाजगी कर्मचारी, नगर भुमापन अधिकारी कार्यालय,जळगाव खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडे नगर भुमापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून सदर काम करुण आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे प्रथम प्रत्येक नोंद घेण्यासाठी 15000 व कामाला सुरूवात करुन देण्यासाठी 1500 रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 1000 रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आरोपी यांचे विरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगांव, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई – जळगाव एसीबी चे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर,पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे पोकॉ/ राकेश दुसाणे ,पो कॉ/ अमोल सुर्यवंशी यांनी केला आहे.