MIDC मधील कंपन्यामध्ये चोऱ्या करणाऱ्या दोन टोळया जेरबंद..
जळगाव – एमआयडीसी परीसरातील दोन वेगवेगळ्या एक साई प्रेरणा इंडस्ट्रीज आणी महालक्ष्मी युनी एक्झीम या कंपनीत रात्रीचे वेळेस अज्ञात चोरटयांनी प्रवेश करुन चोरी केल्याची घटना घडलेल्या होत्या. त्यात साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीतुन 3,03,000/-रुपये किंमतीचे कंपनीत असलेले तांब्याच्या व अॅल्युमीनीयमच्या वायरींग, ईलेक्ट्रीक मोटार, हीट कंट्रोलर, पॅनल, लोखंडी पॅनल, लोखंडी बिम रोल, दोन गेअर बॉक्स, ट्रांन्सफॉर्मर, प्लास्टीकच्या 30 भरलेल्या व्हर्जीनच्या दाण्याच्या बॅगा असा मुद्देमाल चोरी झाल्याचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे.
तसेच एन/98 मधील महालक्ष्मी युनी एक्झीम कंपनीतील 50,000/-रुपये किंमतीचे 02 किलो चांदी चे साहीत्य त्यात पुजेसाठी ठेवलेले चांदीचे भांडे त्यात, 1 किलो वजनाचे चांदीचे नाणे, पुजेसाठी वापरले जाणारे ताट, घंटी, प्लेट, लोटा, अगरबत्ती स्टैंड वगैरे असे एकुण 2 किलो वजनी चांदी व 60,000/- रुपये रोख असा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.
असे वेगवेगळे दोन गुन्हे दाखल होते गुन्हे दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोधपथकातील पोलीस अंमलदार यांना सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या, त्यानुसार गुन्हे शोधपथकातील पोलीस पथक यांनी सतत पाठपुरावा करुन गोपणीय बातमीच्या आधारे साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीत चोरी करणारे संशईत नामे 1) उमेश उर्फ भावड्या संतोष राजपुत, रा सुप्रीम कॉलनी जळगाव, 2) आकाश सुरेश शिंदे रा साईनगर कुरूंबा, 3) पृथ्वीराज उर्फ डुब-या बच्चन बागडे यांना त्यांचे राहते घरातुन सापळा रचुन दिनांक 09/02/2025 रोजी अटक केली. त्यांची पोलीस कस्टडी रीमांड घेवुन सदर संशईतांकडुन 1,11,500 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा तपास पोउपनि चंद्रकांत धनके पोका योगेश घुगे हे करीत आहे.
तसेच एन/98 मधील महालक्ष्मी युनी एक्झीम या कंपनीत चोरी करणारे संशईतांना सुध्दा गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी गोपणीय बातमी काढुन सतत पाठपुरावा करून सुप्रीम कॉलनी परीसरात राहणारे संशईत, 1) प्रकाश उर्फ गिड्डा काळु राठोड, 2) गोविंदा उर्फ लम्बा देविदास ढालवाले दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी जळगाव यांना दिनांक 10/02/2025 रोजी गुन्हे शोधपथकातील अंगलवार यांच्या मदतीने ताब्यात घेवुन अटक करुन त्यांची दिनांक 15/02/2025 पर्यंत पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीत असतांना दोन्ही संशईतांनी सदर कंपनीत त्यांचे अजुन 03 साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपीतांनी त्यांच्या वाट्यावर आलेल्या 35,000/- रुपये पैकि एकुण 22,000/- रुपये काढुन दिलेले आहे. फरार आरोपीतांचा शोध सुरु आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि राहुल तायडे, पोना योगेश बारी हे करीत आहे.
सदर दोन्ही गुन्हे हे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोना योगेश बारी, किशोर पाटील, पोका सिध्देश्वर डापकर, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकुर, योगेश घुगे यांनी उघडकिस आणलेले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
१ हजाराची लाच : नगर भूमापनचा खाजगी कर्मचारी ACB च्या जाळ्यात..
MIDC पोलीसांची कामगिरी नागपूरहून अपहार झालेला ४ लाख ८५ हजाराचा लसूण जप्त..