बुकिंग केलेली केळीची रोपे शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी.
यावल दि.४ ( सुरेश पाटील ) – रावेर लोकसभा मतदारसंघात केळीची बुकिंग केलेली रोपे शेतकऱ्यांना तात्काळ मिळणे बाबतची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष गणपतराव नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर लोकसभा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा सचिव अमोल पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी यांना व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.केळी पिकाची लागवड करण्यासाठी शेतकरी केळीची वेगवेगळ्या ठिकाणाहून व वेगवेगळ्या कंपनीची केळीची रोपे बुकिंग करतात.याचे कारण असेकी केळी पिकाची लागवड ही योग्य वेळी व्हावी जेणेकरून या पिकातून पुढे चालून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं,योग्य वातावरण मिळावं, व्यापाऱ्यांकडून होणारा त्रास वाचावा आणि जास्तीत जास्त उत्पन्न निघून जास्तीत जास्त भाव मिळून जास्तीत जास्त आर्थिक नफा हा शेतकऱ्याला व्हावा हा यामागचा शेतकऱ्यांचा हेतू असतो. त्यासाठी शेतकरी बांधव ५ ते ६ महिने अगोदर केळी या पिकाची पाच रुपये प्रमाणे रुपये बुकिंग करतात.काही शेतकऱ्यांजवळ आर्थिक अडचणी असताना तो शेतकरी व्याजाने सुद्धा पैसे घेऊन केळीची रोपे बुकिंग करतात,पण हे एजन्सी घेतलेले दुकानदार कृषी केंद्र वाले या लोकांना या गोष्टीचे गांभीर्य दिसतच नाही याचे कारण असे की ही मंडळी शेतकऱ्यांना ५ ते ६ महिने अगोदर रोपे बुकिंग करून सुद्धा त्यांना वेळेवर त्यांनी दिलेल्या तारखेला रोपे पुरवत नाही काहीअडचणीमुळे ४ ते ८दिवस रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांपर्यंत करता येत नाही हे शेतकरी ही समजू शकतो पण चक्क १ महिने ते २ महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना रोपे मिळत नाही.
केळीची रोपे बुकिंग करून सुद्धा शेतकऱ्यांना यांच्याकडे चक्रा माराव्या लागतात.त्यातल्या त्यात रोग बुकिंग करताना रोपे बुकिंगचा कोणता फॉर्म भरून घेतला जात नाही किंवा काही ठिकाणी बुकिंग पावती सुद्धा दिली जात नाही.त्यामुळे पुरावा म्हणून पावतीही नसल्यामुळे त्यांच्या तालावर नाचावे लागते आणि त्यांच्यावर कोणतीही रितसर कारवाई करता येत नाही,ही शेतकऱ्याची मोठी फसवणूक आहे.प्रत्यक्ष भेटल्यावर उडवा उडवीचे उत्तरे देतात.फोन केला फोन उचलत नाहीत आणि फोन केलात आणि उचलल्यावर त्यांची ही तीच उत्तरे आणि तोच प्रकार असतो.ही लोकं ओळखीच्या लोकांना बुकिंग केलेली नसताना रोपे जेव्हा त्यांना लागत असेल तेव्हा त्यांना रोपांचा पुरवठा करतात. कधी कधी रोपांच्या मूल्यापेक्षा ५० पैसे ते १ रुपया जर कोणी आयत्यावेळी जास्त देत असेल तर स्वतःचा आर्थिक फायदा पाहून हे लोक रूप बुकिंग केलेल्या शेतकऱ्याला रोप न देता जास्त रक्कम देणाऱ्याला रोपे पुरवतात अशी माझ्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार आलेली आहे.वरील सर्व प्रकार पाहता आपण या लोकांच्या मनमानी कारभार व शेतकऱ्यांना होणारा मानसिक त्रास त्यांची फसवणूक लक्षात घेऊन आपण या लोकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनाच्या प्रती जिल्हा कृषी अधिकारी जळगाव जिल्हाधिकारी साहेब जळगाव तहसीलदार साहेब तहसील कार्यालय यावल यांच्याकडे देण्यात आले असून निवेदनावर रावेर लोकसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा सचिव अमोल बन्सीलाल पाटील तसेच जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांच्यासह योगेश कोळी निखिल पाटील यांची स्वाक्षरी आहे.