भुसावळ – महावितरण च्या साहाय्यक अभियंत्यास नवीन विज मिटर बसवून देण्यासाठी 4 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून अमित दिलीप सुलक्षणे , सहायक अभियंता म.रा.वि.वि.क. मर्यादित चोपडा शहर कक्ष २ असे त्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांच्या घरी नवीन विज मिटर बसवून देण्या करीता अमित दिलीप सुलक्षणे , सहायक अभियंता यांनी 5,500/- रूपये लाचेची मागणी केले बाबत तक्रारदार यांनी दि.11/3/2025 रोजी ल. प्. वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती.सदर तक्रारीची पडताळणी केली असता वरील अमित दिलीप सुलक्षणे , सहायक अभियंता यांनी तक्रारदार यांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम 5500 व तडजोड अंती 4500 रुपयाची मागणी करून सदर लाच रक्कम दि.12/3/2025 रोजी स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई
जळगाव एसीबी चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पो ना/मराठे, पो ना/राकेश दुसाने यांनी केली.